Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराहुल गांधींवर टीका करणा-या योगेश सोमणांवर कारवाई करणार : गृहमंत्री

राहुल गांधींवर टीका करणा-या योगेश सोमणांवर कारवाई करणार : गृहमंत्री

Rahul Gandhi Anil Deshmukh

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ‘थिएटर ऑफ आर्ट्स’चे संचालक योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमणांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोमण यांच्या अडचणी वाढणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक योगेश सोमण यांनी राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. प्राध्यापकाचं काम मुलांना शिकवणं आहे, अशाप्रकारची वक्तव्य करणं नाही. त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे,  पण लवकरच कारवाई केली जाईल, असं अनिल देशमुख यांनी ‘एएनआय’ला सांगितलं.

योगेश सोमण यांनी  फेसबुक पोस्टवरुन केली होती टीका…

योगेश सोमण यांनी १४ डिसेंबरला फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. राहुल गांधीनी वीर सावरकरांवर टीका केल्यानंतर त्याला प्रत्युत्तरादाखल सोमणांनी व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये राहुल गांधी आणि इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती.

त्या व्हिडिओच्या निषेधार्थ सोमण यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी ‘एनएसयूआय’ या विद्यार्थी संघटनेने केली होती.

सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्यामुळे टीका…

अननुभवी शिक्षक, अर्धवट शिकवून अभ्यासक्रम पूर्ण केल्याची घोषणा, नाट्यशास्त्र विभागातील गैरसोयी अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. यानंतर सोमवारी रात्री उशिरा योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. त्यामुळे या कारवाईला राहुल गांधींवरील व्हिडीओ आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशी दुहेरी पार्श्वभूमी आहे. मुंबई विद्यापीठाने या सर्व प्रकरणासाठी सत्यशोधक समिती नेमली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई होईपर्यंत सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments