Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रबापरे : मुंबईत झोपडपट्टीत राहणा-या महिलेला कोरोना

बापरे : मुंबईत झोपडपट्टीत राहणा-या महिलेला कोरोना

India's first coronavirus death confirmed in Karnataka

मुंबई : कोरोनाने सर्वत्र थैमान घातला आहे. मुंबईधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका ६८ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेला करोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

त्या महिलेच्या घरी तपास अधिकारी गेलेे असता तिच्या मुलाने, “आमची चाचणी करण्यासाठी तुम्ही इथे का आलात… आम्ही तर गरीब आहोत, आम्ही झोपडपट्टीत राहतो. हा आजार आम्हाला कसा होईल,” असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. या महिलेला करोना असल्याचे १८ मार्च रोजीच्या चचणीमध्ये उघडं झालं. ही महिला मुंबईतील एका मोठ्या झोपडपट्टीमध्ये २५० स्वेअरफुटांच्या घरात राहत असल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

झोपडपट्टीमध्ये करोनाचा रुग्ण अढळल्याची भारतातील हे पहिलेच प्रकरण असण्याची शक्यत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला जेथे राहते त्या झोपडपट्टीमध्ये एक स्वेअर किलोमीटर परिसरात २३ हजार जण राहतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग झाल्यानंतर चाचणी करुन करोना झाल्याचे सिद्ध होण्याच्या १० दिवसांच्या कालावधीमध्ये ही महिला कोणाकोणाला भेटली हे शोधणे अधिकाऱ्यांना कठीण जात आहे. त्याहून कठीण काम म्हणजे या महिलेने जे सार्वजनिक स्नानगृह वापरलं त्या स्नानगृहामध्ये अंघोळ केलेल्या महिलांनाही करोना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी गोंधळात पडले आहेत.

अमेरिकेहून परला होता व्यक्ती…

७ मार्च रोजी मुंबईतील मध्यवर्ती भागामध्ये राहणारा ४९ वर्षीय व्यक्ती अमेरिकेहून परत आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी ही महिला साफसफाईसाठी रोज जात होती. दहा दिवसानंतर म्हणजे १७ मार्च रोजी या व्यक्तीला करोना झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या इतर चार व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याची आई, मोलकरणी आणि अन्य दोन व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी केवळ मोकरणीला करोना झाल्याचे सिद्ध झालं. इमारतींमध्ये करोनाग्रस्त व्यक्ती सापडल्यानंतर तो कोणकोणाच्या संपर्कात आला आहे हे शोधून काढणं आरोग्य अधिकाऱ्यांसाठी त्रासाचं असलं तरी शक्य आहे.

महानगपालिकेचे अधिकारी असणारे डॉ. अवधुत कांचन यांनी या महिलेला कस्तुरबा रुग्णालयामधील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं असून तिला फोन वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती दिली. या महिलेने वापरलेला फोन नंतर ती तिच्या मुलाकडे देईल त्यामधून संसर्ग वाढेल अशी भिती डॉक्टरांना आहे. “कस्तुरबामधील डॉक्टरांनी या महिलेला तिच्या जवळच्या संपर्कात कोण आहे यासंदर्भात चौकशी केली असता तिला नीट उत्तरं देता आलं नाही. ही महिला घाबरलेल्या अवस्थेत अाहे.

आरोग्य अधिकाऱ्यांना या महिलेच्या मुलाची चौकशी केली. हा मुलगा रोजंदारीवर काम करतो. त्याने करोनाची चाचणी करण्यास नकार दिला. “माझ्यात कोणतीही लक्षणे निदसत नाही. मी केवळ झोपडपट्टीमध्ये राहतो म्हणून मला तुम्ही रुग्णालयात दाखल करण्याचा विचार करत आहात का असा सवालही त्याने विचारला. त्यावेळी आम्ही त्याला हा आजार कसा पसरतो आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबाला कसा धोका आहे हे समजावून सांगितले,” असं कंचन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या मुलाने आपली आई करोनाग्रस्त रुग्णाबरोबरच इतर तीन घरांमध्ये काम करायची अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. आरोग्य अधिकाऱ्यांनी या पैकी दोन घरांमध्ये जाऊन घरातील व्यक्तींना करोनाचा चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयामध्ये पाठवलं.

ही महिला ज्या झोपडपट्टीमध्ये राहते त्या झोपडपट्टीमधील घरे अगदीच २५० स्वेअरफुटांची आहेत. सर्व घरे एकमेकांच्या बाजूला आहेत. या घरांच्या भिंतीही एकमेकांना लागूनच आहेत. या महिलेची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ ५०० घरांना भेटी दिल्या. या घरांमध्ये राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तींना खोकला, सर्दी किंवा तापाची लक्षणे असल्याची चौकशी अधिकाऱ्यांनी केली. मात्र त्यांना अशी लक्षणे असणारी एकही व्यक्ती अढलली नाही. ही महिला वापरत असणाऱ्या स्नानगृहामधून कोणाला संसर्ग झालेला नसावा अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे स्नानगृह रोज स्वच्छ केलं जातं.

या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं सुरु असतानाच या महिलेच्या आजूबाजूला राहणाऱ्या आठ लो रिस्क कॉनटॅक्टमधील व्यक्तींना होम क्वॉरंटाइन राहण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांनी दिले आहेत. “या लोकांना होम क्वॉरंटाइन म्हणजे काय हे समजावणे आणि यामुळे त्यांच्या गोंधळ निर्माण न होऊ देणे हे आमच्यासमोरचे खूप मोठे आव्हान आहे. आम्ही शेजाऱ्यांकडे ही महिला कोणाबरोबर दिसली होती का याबद्दल चौकशी केली. त्यांनी काही नावे सांगितली असून आम्ही त्या व्यक्तींचा शोध घेत आहोत,” अशी माहिती वॉर्ड अधिकारी असणाऱ्या डॉ. भूपेंद्र पाटील यांनी दिली.

या महिलेच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांच्या करोना चाचण्यांचे निकाल शुक्रवारी आले आणि कोणालाही करोना झालेला नाही हे स्पष्ट झाल्यामुळे अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments