Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeकोंकणठाणेठाण्यातील तरुणी हडपसर किल्ल्यावरुन साडेचारशे फूट खोल दरीत पडून ठार

ठाण्यातील तरुणी हडपसर किल्ल्यावरुन साडेचारशे फूट खोल दरीत पडून ठार

Thane Shiv Jayanti,Thane, Shiv, Jayanti,Thane Shivaji Jayanti, Shivaji Jayantiपुणे : ठाण्यातील तरुणी शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळील हडपसर किल्ल्यावर गेली होती. त्याचवेळी तरुणी पाय घसरून साडेचारशे फूट खोल दरीत पडली. त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्या. आज बुधवारी (१९ फेब्रुवारी) ही घटना घडली. सिद्धी कामठे (वय २०) असं मृत तरुणीचं नाव आहे.

आज सर्वत्र शिवजयंती साजरी करण्यात आली. मुंबई-ठाण्यातील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर गेला होता. त्यांच्यासोबत ठाण्यातील सिद्धी कामठे देखील होती. सकाळी ११.३० ते १२ च्या सुमारास हडसर येथे कुटीची वाट येथे सिद्धीचा पाय घसरला आणि ती साडेचारशे फूट खोल दरीत पडली.

पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन संघाचे रमेशभाऊ खरमाळे, सागर जाबरे, मंदार सन्नाक आणि स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीनं तिला दरीतून बाहेर काढलं. त्यानंतर जुन्नर येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. पोलिसांची या घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबीयांना दिली आहे. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments