Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भबुलडाणाZP RESULT : बुलडाणा जिपमध्ये अध्यक्ष – उपाध्यक्षाची बिनविरोध निवड

ZP RESULT : बुलडाणा जिपमध्ये अध्यक्ष – उपाध्यक्षाची बिनविरोध निवड

Buldhana ZP election result,Buldhana, ZP, election results,Buldhana ZP, election, results,Zilla Parishadबुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांची वर्णी लागली  आहे. भाजपच्या उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा पवार तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या कमलताई बुधवत यांचे अर्ज दाखल झाले होते. भाजपतर्फे अध्यक्ष पदासाठी रुपाली काळपांडे आणि उपाध्यक्षपदासाठी जयश्री विनोद टिकार असे दोन अर्ज दाखल झाले होते. मात्र भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी त्यांचे अर्ज शेवटच्या क्षणी मागे घेतल्याने बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मनीषा पवार वर्णी लागली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कमलताई यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासआघाडी असल्याने भाजपला सत्तेबाहेर राहावं लागलं आहे. यापूर्वी भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी करुन सत्ता घेतली होती. मात्र आता महाविकासआघाडीने एकत्र जिल्हापरिषदेत सत्ता स्थापन केली  आहे.

बुलडाणा जिल्हा परिषद पक्षीय बलाबल…

एकूण सदस्य संख्या ६०

काँग्रेस – १४

राष्ट्रवादी – ८

शिवसेना – १०

भाजप – २३

भारिप – २

अपक्ष – २

(भाजपच्या एका सदस्याच्या राजीनाम्याने १ जागा रिक्त)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments