Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeपाककलाउपवासाचा बटाटा वडा

उपवासाचा बटाटा वडा

उपवासाला काय खाऊ काय खाऊ नये यावरही आपण चर्चा चालते. परंतु उपवासाला हा बटाटा वडा करुन खाऊ शकता.    सारणासाठी साहित्य

  • १ किलो उकडलेले बटाटे
  • १ कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले
  • आले
  • हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)
  • बारीक कापलेली कोथिंबीर
  • चवीप्रमाणे मीठ
  • साखर
  • एक चमचा लिंबू रस
  • दाण्याचा कुट
  • खवलेला ओला नारळ

कव्हरसाठी साहित्य

  • राजगिरा पीठ
  • शिंगाडा पीठ
  • साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल)

पाककृती

प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.

नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.

नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.

एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.

त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.

तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.

नंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments