Placeholder canvas
Friday, April 19, 2024

खरवस

खरवस प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.

जिन्नस

  • १ लिटर चीक (खरवसाचे दूध)
  • १ कप दूध
  • ३०० ग्रॅम गूळ
  • १०० ग्रॅम साखर
  • वेलची किंवा जायफळाची पूड

पाककृती

चीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे. त्यात १ कपभर दूध घालून गाळावे.

मग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे.

कुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे.१५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे. थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात.

खरवस उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments