Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeपाककलाबांगडा मसाला

बांगडा मसाला

बांगडा मसाला: चटपटीत आणि खमंग मसालेदार बांगडा मसाला खवय्यांच्या पसंतीस उतरणारा खास महाराष्ट्रीयन पदार्थ आहे.

 जिन्नस

  • ४ बांगडे
  • १ वाटी खवलेला नारळ
  • १ मोठा कांदा
  • ५-६ लाल मिरच्या
  • थोडी चिंच
  • मीठ
  • २ मोठे चमचे तेल

मसाला

  • अर्धा चमचा मेथी
  • अर्धा चमचा हळद

पाककृती

बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या.

खवलेला नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.

कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.

नंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.

त्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या.

त्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा.

भाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments