होम पाककला मांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी

मांसाहारीप्रेमींसाठी खास डिश आहे मद्रास चिकन करी

57
0
शेयर

नावावरुनच कळून येते की ही चिकन करी आपण मद्रासी स्टाईलने बनविणार आहोत. नारळाच्या दुधाचा वापर करुन बनविण्यात आलेली ही टेस्टी चिकन करी कशी बनवावी याची रेसिपी खास तुमच्यासाठी तर बघू या काय काय आहेत. या रेसिपीमध्ये.

बनविण्यास लागणारा वेळ – १० मिनिटे
तयारीसाठी लागणारा वेळ –  २० मिनिटे
साहित्य
चिकन
कांदे
टमाटे
तमाल पत्र
नारळाचे दूध
गरम मसाला
हळद
मीठ
धनेपूड
लाल तिखट
आल-लसूण पेस्ट
हिरवी मिरची
बनविण्याची कृती 
गॅसवर पॅन गरम करा. त्यात तेल टाका. आता यात तमालपत्र, कांदे, मीठ, हिरवी मिरची परतवून घ्या. आता यात वरतून आल लसणाची पेस्ट टाका आणि पाणी घाला.
हे मिश्रण नीट शिजवून घ्या. आता यात मसाला, हळद, धनेपूड, लाल तिखट, टोमॅटो शिजवून घ्या. यानंतर यात थोडे पाणी घाला.
आता यात चिकनचे पीसेस घाला. मसाला आणि चिकनचे पीसेस शिजले की नाही हे पाहा. यात वरतून थोडासा गरम मसाला, नारळाचे दूध आणि चवीनूसार मीठ घाला.
गरमागरम मद्रास चिकन करी तयार आहे. चपाती किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.