अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री अनीता हसनंदानी. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती लवकरच एक गोड बातमी देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर बेबी बंपसह फोटो शेअर करताना दिसत आहे. आता अनीताने बेबी बंपसह चक्क शकिरा गाण्यावर डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

नुकताच अनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी बंपसह शकिरा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘एकदा जो कोणी शकिराचा फॅन होतो तो कायम शकीराचा फॅन राहतो’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सध्या अनीताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अनिताने ‘नागिन ४’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए ९’मध्ये तिने आणि तिच्या पतीने सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here