सोन्याचा डोंगर सापडला; लोकांची सोनं लुटण्यासाठी अलोट गर्दी, पाहा व्हायरल व्हिडीओ

- Advertisement -
mountain-of-gold-was-found-congo-of-central-africa-alot-crowd-to-rob-people-video-viral
mountain-of-gold-was-found-congo-of-central-africa-alot-crowd-to-rob-people-video-viral

काँगो: सोने सर्वात मौल्यवान धातू आहे. नेहमीच्या वाढत्या किमतींमुळे सोने-चांदी घेणं लोकांसाठी अवघड झाले आहे. दुसरीकडे सोन्याची क्रेझही वाढत आहे. अशा परिस्थितीत फुकट सोने मिळाल्यास काय कराल? ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे. सोने मोफत मिळवण्याची संधी कोणीच गमावणार नाही. आफ्रिकेच्या काँगोमध्येही असेच घडले आहे, जेथे ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे.

सोने लुटण्यासाठी डोंगर खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल

कॉंगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी लिहिले आहे की, सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या कॉंगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

सोने लुटण्यासाठी ग्रामस्थांची अशी झाली गर्दी

स्थानिक लोकांना या डोंगराची माहिती मिळताच हजारो ग्रामस्थांनी सोने लुटण्यासाठी धाव घेतलीय. डोंगरावर सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली होती. कॉंगो देशाच्या बर्‍याच भागात सोन्याचे अस्तित्व आहे. अशा परिस्थितीत तेथे सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील.

- Advertisement -