युतीचं गुलूगुलू!

- Advertisement -

शिवसेना,भाजपा दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडीच राजकारण करुन जनतेच मनोरंजन करत आहेत. सत्तेच्या संसारात एकमेकांची अब्रु काढणारे दोन्ही पक्ष सत्तेची फळे चाखत गुलूगुलू करत आहेत. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे पदाधिकारी भाजपावर आणि भाजपा शिवसेनेवर टीकेची एकही संधी सोडत नाही. तरी सुध्दा दोघांचा संसार सुखी आहे. शिवसेना विरोधी बाकावर आहे अशा प्रकारे टीका करते. शिवसेना पक्षप्रमुख यांनी यापूर्वी जी विधाने केली होती ती जनता विसरु शकत नाही. ठाकरे अस म्हणाले होते की,शिवसेना ‘२५ वर्ष युतीमध्ये राहिल्याने नासली’. अशी टीका करुन यापुढे शिवसेना भाजपा सोबत युती करणार नाही. अशी घोषणा केली होती. मात्र राज्याच्या आणि केंद्राच्या सत्ताकारणात शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला. शिवसेनाही सत्तेची फळे चाखत आहेत.परंतु भाजपा आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री व सरकारच्या ध्येयधोरणावर टीका केली नाही. असा एकही दिवस जात नाही. असा प्रकार सुरु असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र इमारती नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी इमारत बांधण्याचा योजनेला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने योजना सुरु करायला मंजुरी दिली. पुढील चार वर्षांत ही योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी ४४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी पुढील दोन महिन्यांत २५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा पाच हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींना लाभ होऊ शकतो.परंतु एकमेकांवर टीका करणारे आणि दररोज एकदुसऱ्यांचे कपडे फाडणाऱ्या भाजपामध्ये ‘शिवसेनेबद्दल’ एवढ प्रेम ऊतू का आलयं. खरतर भाजपाला भिती आहे की? शिवसेना ही सरकारचा पाठिंबा काढू शकते सत्ता घालू शकते. अशी भिती त्यांच्या मनात आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेच्या इतक्या हल्ल्यानंतरही आपली तलवार म्यान ठेवली. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेसने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र अशी तिरंगी लढत झाल्यास भाजपपुढे आव्हान उभे राहू शकेल. शेतकरी व विशेषत: ग्रामीण भागात भाजपबद्दल तेवढी आपुलकी राहिलेली नाही हे गुजरातच्या निकालावरून स्पष्ट झाले. अशा वेळी शिवसेनेची एकदम नाराजी नको, अशी मुख्यमंत्र्यांची खेळी तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होतो. मात्र एकाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची खुर्ची टिकविण्यासाठी शिवसेनेला एका प्रकारे बाळासाहेबांच्या नावे योजना सुरु करुन शिवसेनेला एकाप्रकारे बळ दिले. परंतु दोन्ही पक्ष एकमेकांबरोबर असले तरी ते मलिदा लाटत आहे. हे शहाण्याचा जनतेला कळते. मात्र सोबत नांदणाऱ्या दोन्ही पक्षांनी सत्तेचा सदुपयोग करावा. राज्याचा विकास होईल त्या दृष्टीने काम कराव एवढीच जनतेची अपेक्षा!

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

- Advertisement -