शिवसेनेने भाजपाला धडा शिकवला

- Advertisement -

मुंबई महापालिकेत २०१९ मध्ये आमचाच महापौर राहिल असे विधान भाजपाचे बोलबच्चन नेते खासदार किरीट सोमय्या,आमदार आशिष शेलार यांनी गुरुवारी केले होते. भांडुप पोटनिवडणुकीचा निकाल भाजपाच्या बाजूने आल्यामुळे त्यांनी राजकीय मग्रुरीतून हे विधान केले होते. खरतर राजकारणात छुपे डावपेच खेळले जातात. परंतु भाजपाच्या दोन्ही बोलबच्चन नेत्यांनी अती उतावीळपणा केल्यामुळे शिवसेनेने त्यांच्या मनसुब्यावर हाणून पाडला. भाजपाकडे ८३ नगरसेवकांचे संख्याबळ आहेत. तर शिवसेनेचे संख्याबळ ८४ आहे. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे सहा महिण्यानंतर पोटनिवडणूक होणार आहे ती जागा वाढल्यानंतर भाजपाचे संख्याबळ ८४ झाले असते. शिवसेना आणि भाजपाचे संख्याबळ सारखेच झाले असते. काही अपक्षांना सोबत घेऊन भाजपाला त्यांचा महापौर बनवायाचा डाव होता. परंतु त्यांच्या बोलबच्चण नेत्यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे मुंबई महापालिकेवर महापौर बसवण्याचे विधान करुन टाकले. हे विधान केल्यानंतर शिवसेनेने २४ तासाच्या आतच मनसेचे सात पैकी सहा नगरसेक आपल्या तंबुत घेतले. म्हणजे शिवसेनेचे ८४, मनसेचे ६ आणि अपक्ष ४ अशी एकुण ९४ संख्याबळ शिवसेनेकडे झाले आहेत. भाजपा शिवसेनेच्या महापौरांवर अविश्वास आणून खेळी खेळण्या आधीच शिवसेनेने त्यांना नामोहरण करुन टाकले. राजकारणात डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर ठेवून काम करावे लागते. म्हणजेच डोक थंड ठेवून आणि गोड बोलून काम करावे लागते. परंतु भाजपाच्या बोलबच्चन नेत्यांना भांडपूच्या पोटनिवडणूकीत विजय का मिळवला आणि त्यांनी भाजपाचीच फजिती करुन टाकली. मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी करुन टाकली. शुक्रवारी दुपारनंतर सगळ्या घडामोडी घडून आल्यात. शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षामध्ये तमाशा सुरु आहे. दररोज आरोप प्रत्यारोप हे दोन्ही पक्ष करीत आहेत. कोण कुणापेक्षा मोठा आहे हे दाखवण्याचे दोन्ही पक्ष काम करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर  महापालिका निवडणूकीच्या आधी खासदार किरीट सोमय्या यांनी थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामुळे सोमय्या,भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्याबद्दल शिवसेनेच्या मनात राग होताच. सोमय्या यांनी गुरुवारी महापौर आमचाच राहिल विधान केल्यानंतर त्यांना चांगले महागात पडले. शिवसेना, भाजपामध्ये भविष्यात चांगलाच वाद रंगण्याची शक्यता आहे.

- Advertisement -