Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख…तर ‘लढाई’ अशीच असेल!

…तर ‘लढाई’ अशीच असेल!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि काँग्रेस प्रवक्ता मनिष तिवारी यांच्यासोबत एकाच मंचावर आले होते. निमित्त होते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशनाचे. यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल यांनी पुढील लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरोधात संपुर्ण देश अशी होईल असं सांगितलं. ‘देशात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण असून लोकांना आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. २०१९ मध्ये कोणतेही पक्ष नाही तर लोकच लढणार आहेत’, असं अरविंद केजरीवाल बोलले. खरतर केजरीवाल यांनी देशातील सध्याची परिस्थिती बघून जे विधान केले त्या विधानात बरचं काही दडलेलं आहे. कारण मोदी यांना स्वत:च्या पक्षातूनच आता विरोध होत चालला आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते उघड पणे बोलत आहेत. जनतेच्या मनात जे सुरु आहे जी नाराजी आणि चिंता पसरेली आहे तेच भाजपाची नेते मंडळी बोलून दाखवत आहे. सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. परंतु हे टीकाकार कोण आहेत? डॉ.मनमोहनसिंग, पी.चिदंबरम् आणि राहुल गांधी, झालेच तर भाजपाचे ज्येष्ठ माजी मंत्री यशवंत सिन्हा, माजी मंत्री अरुण शौरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ही सारीच माणसे मोदीं विषयीचे शल्य मनात घेऊन आहेत. त्यामुळे मोदींना जे दिसते ते यांना दिसत नाही असे मोदींना बोलायचे आहे का? देशाचा आर्थिक विकासदर हा ५.६ टक्क्यावर आला आहे. हे भाजपाच्या किंवा काँग्रेसच्या, इतर विरोधी पक्षांच्या मंडळींनी सांगितले नाही. स्टेट बॅंकेच्या अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेली आकडेवारी होती. चलनाबद्दलच्या निर्णयामुळे सरकारलाच २६ हजार कोटींचा फटका बसला. चिदंबरम किंवा अरुण शौरींनी सांगितले नाही. मोदींच्याच सरकारने सांगितले आहे. ४०० पेक्षा जास्त कंपन्या डबघाईस आल्यात. त्यापेक्षाही जास्त कंपन्या दिवाळखोरी जाहीर करायला निघाल्या आहे. हे सरकारच्याच आर्थिक अन्वेषण विभागाने सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती २०० टक्क्यांनी वाढल्या हे आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहेत. सोशल मिडियावर सरकारने दिलेले वचन आणि जनतेला सहन करावा लागत असलेला त्रास व्यक्त होते आहे. सर्वसामान्य जनेतेमधून विरोध दिसून येत आहे. यामुळे अरविंद केजरीवाल यांनी यशवंत सिन्हा यांच्याकडे इशारा करत सांगितलं की, ‘युद्ध तुमचे नेता, तुमचे वरिष्ठे नेता आणि लोकांमध्ये होणार आहे’. ‘विरोधक एकत्र येवो अथवा न येवोत, हे अंकांचं गणित आहे जे राजकारणात गरजेचं आहे. पण जे लोकांमध्ये सुरु आहे ते मी सांगू शकतो. लोक एकवेळचं अन्न त्यागू शकतात, मात्र आपल्या स्वातंत्र्याशी तडजोड करु शकत नाहीत’, असं अरविंद केजरीवाल बोलले. लोकांमध्ये संताप आहे. हे विरोधकांनी आणि सरकारमधील मंडळींनीही ओळखलेलं आहे. यामुळे २०१९ मध्ये मोदी विरुध्द म्हणजेच भाजपा विरुध्द विरोधक नव्हे तर जनता लढेल असा अंदाज केजरीवाल यांनी व्यक्त केला. हे भाजपाच्या विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी समजून घेणे गरजेचे आहे. अन्यथा २०१९ मध्ये केजरीवाल यांनी केलेले जे भाकित आहेत तशीच असू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments