Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखदंगलींना मीडियाही जबाबदार!

दंगलींना मीडियाही जबाबदार!

भारतात लोकशाही संपली असून हुकूमशाही सुरु असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ ढासळले आहे. यामुळे देशातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली. सर्व परिस्थितीला सरकार तर जवाबदार आहेच; परंतु त्यापेक्षाही जास्त काही मीडिया हाऊस याला जबाबदार आहेत. हे मीडिया हाऊस सरकारची दलाली करत असल्यामुळे देशात अशांतता पसरली आहे. हिंदु – मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही दलाल पत्रकार डिबेट घेऊन वातावरण दुषीत करण्याचे काम सरकारच्या इशाऱ्यावर करत असल्याची शंका उपस्थित होते. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये २६ जानेवारी रोजी हिंसा घडवण्यात आली. अब्दुल हमीद चौकात काही तरुण प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी एकत्र जमले तेथे तिरंगा फडवण्याची तयारी पूर्ण झाली. त्याचवेळी विश्वहिंदू परिषद,अखिल भारतीय विघार्थी परिषदेचे काही तरुण हातात भगवे झेंडे,तिरंगे झेंडे घेऊन आले. ‘ईस देशमे रहेना होगा वंदेमातऱम् कहेना होगा, ‘मुल्लो का एक ही स्थान, ‘पाकिस्तान’ या ‘कब्रिस्थान’अशा घोषणा लावल्या. याचवेळी या परिसरात दंगा भडकला. दंग्यात चंदन गुप्ता तरुणाचा पोलिस फायरींग मध्ये मृत्यू झाला. एक जीव गेला. शेवटी कुणाच्या घरातील एक व्यक्ती गेला. ज्याच्या घरातील कुणी जातो त्यालाच त्याची किंमत कळते. राजकारण तर होत राहिल परंतु तो जीव आता परत येणार नाही. या सर्व घटनांच्या चित्रिकरणामुळे यामध्ये लपवाछपवी करता येणार नाही. परंतु एका वृत्तवाहिनिचा डिबेट घेणारा पत्रकार रोहित सरगाना आपल्या शोमध्ये बोलतो उत्तर प्रदेश,काश्मिर,केरळ मध्ये तिरंगा लावणे काय गुन्हा आहे. भारतात तिरंगा लावायचा नाही तर काय पाकिस्तानात लावणार? असे चुकीचे आणि दंगली भडकतील अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करुन शो घेतो. देशात दंगली भडकल्या पाहिजेत अशी चर्चा घडवून आणली. ही काही पहिली गोष्ट नाही अशाच प्रकारचे डिबेट शो घेऊन दररोज हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल असे काम रोहित सरगाना, सारखे काही पत्रकार करत आहेत. त्यांचाच दुसरा पत्रकार आशुतोष मिश्रा याने ग्राउंड रिपोर्ट घेतला असता तेथे हिंदु,मुस्लिम समाजाच्या लोकांनी सांगितले की,जे तरुण दुचाक्यावंर आले होते त्यांनी हिंदुस्थान मे रहेना है तो वंदेमातम् कहेना होगा अशा घोषणा लावल्या. त्यामुळेच परिस्थिती चिखळली. दुसऱ्या दिवशीही जाळपोळ,तोडफोड,बंद,दगडफेक सारख्या घटना घडल्या. अशी सर्व परिस्थिती असतांना बरेलीतील जिल्हाधिकारी राघवेंद्र विक्रमसिंह यांनी फेसबुकवर रविवारी रात्री एक पोस्ट टाकली. यात ते म्हणाले, अजब पद्धत सुरु झाली आहे. मुस्लीमबहुल परिसरात बळजबरीने रॅली काढली जाते. पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या जातात. तिथे राहणारे काय पाकिस्तानी आहेत का? बरेलीतील खैलममध्येही हेच झाले होते. आधी दगडफेक आणि मग खटले, असेही ते म्हणाले. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्व विषयावर बोलण्यास तयार नाही. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे कासगंज पेटलेला असतांना बोलण्यास तयार नाही. मात्र माजी भाजपाचे केंद्रीय मंत्री तेथील विद्यमान राज्यपाल राम नाईक यांनी हा उत्तरप्रदेशला लागलेला कलंक असल्याची टिका केली. मात्र भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वादग्रस्त विधान करुन अकलेचे तारे तोडले. . ही दुर्दैवी घटना असून राज्यात योगी सरकार चांगले काम करत आहे. जर योगीनीं दंगली थांबवण्यासाठी पुढाकार घेतला असता तर २६ जानेवारी रोजी सारखी दुर्देवी घटना थांबली असती. परंतु भाजपाचे मंत्री,विश्वहिंदु परिषद,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे नेते वादग्रस्त विधान करुन दंगलीमध्ये तोल ओतण्याचे काम करत आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हे जनतेने वेळेवरच समजून घेऊन एकोप्याने,गुण्यागोविंदान राहिले पाहिजे. तरच देश एकसंघ राहिल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments