Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभुजबळांसाठी ‘राज’ बळ!

भुजबळांसाठी ‘राज’ बळ!

राष्ट्रवादीची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा सरकारने गेम केल्याचा संताप व्यक्त होत आहे. हे सर्व होत असतांना “भुजबळ जोडो नाही तर भुजबळ छोडो” आंदोलन व्हायला हवे होते असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटल्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना अधीकच “बळ” मिळाले. माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात राजकीय कारस्थानातुन जामिनाला विरोध होत असल्याचा सुर भुजबळ समर्थकांमधून अटके पासून उमटत चालला. जामिनासाठी राज्य सरकार अडथळे आणत असून लोकन्यायालय हाच पर्याय शिल्लक आहे, असे भुजबळ समर्थकांना वाटणे साहजिक आहे. मार्च महिन्यात पाच लाख भुजबळ समर्थक मोर्चाने आझाद मैदानावर धडकणार आहेत. यासाठी राज्यभरातील भुजबळ समर्थकांनी शपथ घेतली. महात्मा फुले समता परिषद मोर्चाचे हत्यार उपसल्याने आंदोलन उग्र रुप धारन करु शकतो. आंदोलनाचा दुसरा टप्पा मार्च मध्ये होत आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी ओबीसी समाजातून संताप उमटत आहे. भुजबळ यांच्या विरोधात राजकीय कारस्थानातुन जामिनाला विरोध होत असल्याने हे षडयंत्र आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जामिनासाठी राज्य सरकार अडथळे आणत असून  लोकन्यायालय हाच पर्याय शिल्लक आहे, असे भुजबळ समर्थकांना वाटत असतांना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मार्च महिन्यात पाच लाख भुजबळ समर्थक मोर्चाने आझाद मैदानावर धडकणार आहेत. यासाठी राज्यभरातील भुजबळ समर्थकांनी आज येथे शपथ घेतली.  देशात व राज्यातील सरकार व त्याचे कारभारी प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करुन जनतेवर अन्याय करीत आहेत. छगन भुजबळांनाही त्यासाठीच अडवले गेले आहे. त्यांच्या जामिनाचा नैसर्गिक व मुलभुत हक्क देखील नाकारला जात आहे. यामागे ओबीसी समाजाला असहाय्य करण्याचा त्यांचा डाव आहे. असाही सूर आता ओबीसी समाजतून सरकारच्या विरोधात उमटत आहे. ओबीसी समाज संतप्त झाला आहे. यामुळे सरकारची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना मनसेला राष्ट्रवादीनेच पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचे पक्ष वेगळे असले तरी दोघांचे संबंध मधुर आहेत.  दोन्ही नेते पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असल्यामुळे राज यांच्या त्या विधाने समता परिषदेला आणि भुजबळ समर्थकांना बळ मिळणे साहजिक आहे. नाशिकमध्ये मनसेला भाजपामुळे फटका बसल्यामुळे राज हे भुजबळांच्या समर्थनार्थ भूमिका घ्यायला पुढे आलेत. भुजबळांना जामीन मिळायला काहीही हरकत नव्हती असे मत राज यांनी केले. विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे कार्यकर्तेही त्रस्त झाले आहेत. परंतु भुजबळांना सरकारने जाणून बुजून अडकवले असल्याची भावना आजही ओबीसी समाजामध्ये असल्यामुळे याचा फटका भाजपाला निवडणूकीच्या काळात बसू शकतो. मात्र भुजबळांच्या समर्थकांना राज यांच्या भूमिकेमुळे बळ मिळाले एवढे मात्र निश्चित.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments