Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखमग्…!गुजरात मॉडेलवाल्यांना फौजफाट्याची गरज का?

मग्…!गुजरात मॉडेलवाल्यांना फौजफाट्याची गरज का?

चेहरे पर शिकन, माथे पर पसीना
डरे-डरे से साहेब नज़र आते हैं
शाह-जादा, राफेल के सवालों पर
जाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं
!

असे व्ट्युट करुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधत जय शहा,राफेल,आणि गुजरातमध्ये अडचणीत आलेल्या भाजपाला डिवचण्याचे काम केले. गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाच्या तारखा जसजशा जवळ येत आहे, तसतसं प्रचारात रंगभरत आला आहे. ज्या भाजपाने गुजरात मॉडेलच्या नावाने सर्वत्र सत्ता हस्तगगेली त्याच भाजपाला गुजरात निवडणूकीसाठी आपल्या सर्व नेत्यांना प्रचारात आणून कचखाल्ली असल्याचे स्पष्ट होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यभरात सभा होत आहेत. याआधीही त्यांनी अनेक दौरे केले आहेत. एकदा तर बुलेट ट्रेन भूमिपूजनाच्या निमित्तानं जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यासोबत सप्टेंबरमध्ये एक रोडशो देखील झाला. याव्यतिरिक्त केंद्र सरकारमधले मोठे चेहरे राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती आणि भाजपचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचार करतच आहेत. त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे रमण सिंह यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्य समन्वयक म्हणून केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांची नेमणूक झाली. जवळजवळ दोन दशकांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला इतका मोठा प्रचार कार्यक्रम का करावा लागतो आहे? भाजपला पराभवाची भीती वाटत आहे. भाजप प्रचंड बहुमतानं जर निवडून आलं नाही तर हे त्यांच्यासाठी हरण्यासारखंच असेल. याआधी कधीच भाजपचे इतके सारे केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचारासाठी आले नव्हते. २००७ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भाजपनं काँग्रेसला टोला लगावला होता, त्यावेळी भाजपने असं म्हटलं होतं की, काँग्रेसला पराभवाची भीती आहे. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग प्रचारासाठी गुजरातमध्ये आले आहेत. आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत. गुजरातमध्ये प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. “राज्यात विकास नाही, व्यवसायात प्रगती नाही, रोजगार नाहीत, असं विरोधकांकडून हल्ला होत असतांना भाजपाने, मोदींनी गुजरातमध्ये २२ वर्षात काय केलं होतं याचं उत्तर भाजपाला देता येत नसेल तर त्याचाच अर्थ त्यांनी काहीच विकास केला नाही असा याचा अर्थ होतो. गुजरातमध्ये विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. ९ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होईल. १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. शेवटी मतदार काय करतात हेच बघणे महत्वाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments