Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखसरकारला स्वकीयांकडूनच टोले!

सरकारला स्वकीयांकडूनच टोले!

भाजपाला भाजपाच्याच मंत्र्यांकडून आणि नेत्यांकडून घरचा आहेर मिळत असल्याने सरकारच सत्तास्थान डळमळीत झालं आहेत. भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असे भाजपाचेच मंत्री बोलत असतील तर यापेक्षा दुसरी दुर्देवी घटनाच नाही. केंद्रातील माजी मंत्री,पदाधिकारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि मोदींच्या कारभाराचा पंचनामा केला हे सर्वश्रूत असतांना त्यात राज्याच्या नेत्यांची भर पडली.आता राज्यातील नेतेही देवेंद्र फडणवीस सरकार बद्दल व्यासपीठावर उघडपणे बोलत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकलेले नाही.शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे असा सल्ला दिला. शरद पवार यांच्या कामाचे कौतुक केले. सरकारकडून शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा देऊन आजच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करीत आहे. हे थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. असा इशारा दिला होता, तसेच संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. असे पूर्वीच सांगितले होते. गुजरातमध्ये मोदी सरकारविरुध्द प्रचार करुन पंतप्रधान मोदी हे ‘बोगस ओबीसी’ असल्याची टीका केली होती. तर दोन दिवसापूर्वीच पुण्यातील डाळींब उत्पादकांच्या मेळाव्यात पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, तुमच्या काय ज्या मागण्या असतील त्या आताच सांगा. पुढील वर्षी सरकार बदललेले असेल अशी भविष्यवाणी केली. याचाच अर्थ सरकारच्या कारभारावर ते नाराज होते व सरकार विरोधी वातावरण असल्याचे त्यांना कळून चुकले. बापट  हे सत्य बोलले त्यामुळे त्यांचेही जोरदार स्वागत होत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,यांनी देखील बापट यांचे अभिनंदन केले. केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर त्यांचेच नेते जर उघडपणे टीका करत असतील त्यांच्या मनातही सरकार बद्दल चीड असेल तर इतरांचा प्रश्न न केलेला बरां. आज पक्षातच पक्षाच्या विरुध्द आणि सरकार विरुध्द संतापाची लाट असळली. अच्छे दिन म्हणजे गळ्यात हाडूक बनलेले आहे, हे नितीन गडकरी यांचे विधान किंवा प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होणार, हे निवडणूक प्रचारात दिलेले आश्वासन हे `निवडणूक जुमला`, ही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची कबुली याच वरच्या रांगते बापट यांचे विधान गणले जाईल. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधारी विरोधकांवर टीका करत असता परंतु सत्तेतील पदाधिकारी स्वत:च्या सरकारवर अणि नेत्यांवर टीका करत असतील तर सरकारसाठी हा आताच पराभव आहे.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments