Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयस्त्रीचा आदर परमोच्च स्थानी असावा

स्त्रीचा आदर परमोच्च स्थानी असावा

भारतीय सीने जगताची गुणवत्ता सध्या इतकी मरणासन्न अवस्थेत आहे कि आयटम नंबरच्या प्रमोशन्सकरीता कुठलीही खालची पातळी गाठताना बघायला मिळत आहे. मतीमंद असल्यासारखे गीतकार अतिशय हीन दर्च्याचे गीतांचे बोल लिहितात मग ‘फेविकोल’, ’कुंडी मत खडकाओ राज्जा’, ‘शीला कि जवानी’ किंवा ‘ पिंकी, बबली’ असोत आयटम नंबर ह्या प्रकाराचे सिनेमाच्या मुख्य कथानकाशी काही घेणे देणे नसते मात्र तोकड्या कपड्यातील आयटम गर्लचा सिनेमाच्या अर्थकारणाला फायदा होतो तसेच त्या ए ग्रेडच्या आयटम गर्ल्रचे करियर बनवायला देखील फायद्याचे ठरते. आजकाल ही सर्व आयटम नंबर्स ‘ए’ ग्रेडच्या या तथाकथित हिरोईन्स करायला लागल्या आहेत.  या गाण्यांवर त्यांचे विविध इवेन्ट्स मधील ऑफर्सचे बिझिनेस मोडेल अवलंबून असते. हीच गाणी मग नव वर्ष सिलीब्रेशन्स,फिल्मी अवार्ड्सचे कार्यक्रम किंवा इतर तत्सम कार्यक्रमात परत परफॉर्म केली जातात. जितके हिट गाणे तितकी मागणी जास्त असे ते समीकरण ठरते. या अटीतटीच्या शर्यतीच्या ग्लॅमर जगतात, पैसा कमवण्यासाठी या तारकांना सर्व लाज गुंडाळून ठेवावी लागते.

सिनेमांमध्ये हि गाणी अत्यंत उडत्या चालीची, कामूक आणि लक्षणीय असतात. सिनेमाची जाहीरात करण्यासाठी मुख्यत्वे या आयटम नंबर्सचा उपयोग केला जातो. हि गाणी सिनेमाच्या कथानकाला हातभार लावत नाहीत मात्र त्यामुळे फिल्म निर्मात्याला त्यातल्या त्यात सिनेमाच्या यशाला हातभार लावेल असे गाणे निवडायला सोयीस्कर  पडते. कमर्शियल गणित जुळविण्यासाठी ह्या हिट गाण्यांचा उपयोग होतो आणि त्यांवर प्रेक्षकांच्या प्रचंड  प्रमाणात उड्या देखील पडतात. आणि त्यांवर रीव्युव्सची देखील खात्री असते. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ (हम१९९१)

‘मला चुंबन दे’ हे या पठडीतील प्रथम गाणे म्हणता येईल. यात पुरुषांच्या एका गटाने त्यातील आयटम गर्लला उद्देशून हे गाणे बार मध्ये गायले आहे मध्ये ज्यात सिनेमाचा हेरो देखील सामील आहे. याच पठडीतील छम्मक छल्लो (रावण २०११) , चिकणी चमेली (अग्निपथ२०१२ ) या गाण्यांमध्ये त्यातील आयटम गर्लला नौटंकीत नाचणाऱ्या देशी वेश्येची उपमा दिलेली आहे. गाण्यातील बोल त्यातील स्त्रीचे वर्णन करण्याऐवजी तिच्या गोर्या रंगाचे ,तिच्या दागिन्यांचे वर्णन करतात .हेलनच्या जमान्यापासून हा प्रकार जास्त रूढ झाल्याचे मला आठवते पण त्याकाळी गाण्याचे बोल तितकेसे अश्लील नसायचे . अशी गाणी पडद्यावर सादर करणाऱ्यां नर्तकींचा एक वेगळा गट होता आणि मुख्य नायिकेला मानाचे स्थान होते. मात्र आता हा ट्रेंड बदललाय . अलीकडच्या काळात माधुरी दीक्षितच्या ‘चोळी के पिछे’ आणि ‘एक दो तीन’ या आयटम गाण्यांनी धूम माजवली होती. अश्या गाण्यांमध्ये द्विअर्थी शब्द असतात आणि ते एकाच स्त्रीनामाभोवती गुंफेलेले  असतात. याच जातकुळीत आता ‘शिला कि जवानी’ , ‘मुन्नी बदनाम हुई’ नंतर ‘कुंडी मत खडकाओ राज्जा’ आणि ‘ हलकट जवानी’ ची भर पडली आहे.

‘आयटम नंबर’ ह्या शब्दाचे मूळ नक्की सांगता येत नसले  तरी इतके मात्र नक्की  आहे कि हा शब्द मादक स्त्रीच्या शारीरिक सौंदर्याची तारीफ करतांना तिचे वस्तुकरणाच्या कल्पनेतून रूढ झाला असावा. कारण बम्बैया भाषेत आयटम म्हणजे सेक्सी असा आशय घेतला जातो. या शिवाय मुंबई डान्सबार करिता कुप्रसिद्ध आहे आणि बबली,पिंकी, शीला, मुन्नी हि नाव रेड लाईट एरियातील स्त्रियांकरिता सर्रास वापरली जातात. त्यामुळे अश्या भागात फिरकणाऱ्या वर्गाला अशी  संबोधनं आपलीशी वाटतात. नायिका, गायिका किंवा नर्तिका पैकी कुणालाही नायिका म्हणून पुढे यायचे असेल तर ती आयटम गर्ल म्हणून झळकते.एखाद्या बार मध्ये किंवा नाईटक्लब मध्ये शूट केलेल्या आयटम नंबर पुरतीच ती सिनेमात झळकते. ही गाणी बघतांना तात्पुरती नाकं मुरडली जातात. काही आयटम बॉईस देखील सिने सृष्टीत आहेत आणी काही गाणी त्यांच्या वर देखील चित्रित केली जातात पण सहसा मुलींवर जास्त गाणी चित्रित केली जातात.

आयटम नंबर्स सहसा एकापेक्षा जास्त लोकांवर चित्रित केली जातात. आणि यात आघाडीवर मुख्य आयटम गर्ल किंवा बॉयच्या सोबतीला दोन तीन नर्तक असतात. किंवा बरेचदा सिनेमाची मुख्य नायिकाच आयटम नंबर करते. बरेचदा ‘स्पेशल अपियरंस’ म्हणून बडे नायक किंवा नायिका ही आयटम नंबर प्रस्तुत करतात. बॉलिवूड कडून अजून दर्जेदार सिनेमांची अपेक्षा करणे योग्य राहील का? एक सर्व सामान्य भावना भावना अशी आहे की बॉलिवूड सिनेमाचा भारतीय समाज मनावर  गहरा परिणाम होत असल्या कारणाने यातील महिलांना योग्य पद्धतीने चित्रित केले गेले पाहिजे. पण नुसते सेन्सर बोर्डावर हि जबाबदारी ढकलून चालणार नाही.

आपण दांभिक काळात राहत असल्यामुले एकीकडे आपण महिलांवरील अन्यायाला विरोध करीत आहोत. तिला समाजात अधिक मान मिळावा , तिचे हक्क आणि अधिकार मिळावेत म्हणून प्रयत्नशील आहोत. अश्या प्रकारच्या आंदोलनांच्या कार्यक्रमांना या आयटम गर्ल्सनाच बोलावले जाते दुसरीकडे जवळपास सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्र महिलां संबंधित अश्लील मसाला आपल्या वृत्तपत्रात ठसठसून भरतात.

स्त्री हि तुमच्या मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे साधन म्हणून पृथ्वीवर अवतरलेली नसून जर आपण  स्त्रीचा आदर करत नसू तर आपले अस्तित्व व्यर्थ म्हणता येईल. सिनेमातील अश्लीलता करोडो प्रेक्षकांना काल्पनिक दुनियेत घेऊन जाते. जवळपास प्रत्येक भारतीय सिनेमात गाण्यांना नकळतपणे कथेभोवती गुंफलेली असते. सर्व गाणी एकसारखी नसतात पण अनेकदा एका खास प्रकार बड्या हिट सिनेमांमध्ये हमखास बघायला मिळतो तो म्हणजे आयटम नंबर .अलीकडच्या अश्या गाण्यांमध्ये आयटम गर्ल तोकडा तंग प्रकारचा पहराव घालून उत्तेजक देहबोली सहित द्विअर्थी गीत गातांना, नाचतांना दिसते. अशी गाणी रेडियो आणि टेलीविजनच्या माध्यमातून सतत दिसत राहतात  किंवा कानावर आदळत राहतात आणि देशभरात लोकप्रियता गाठतात. अशी गाणी या आयटम गर्लना सीने सृष्टीत आयटम गर्ल म्हणून प्रस्थापित करतात. आयटम हा शब्दच मूलतः मानहानीकारक असून तो स्त्रीला केवळ एक पुरुषांच्य मनोरंजनाचे साधन म्हणून बिरूद लावतो. प्रत्यक्ष व्यक्तीमत्वापेक्षा त्यांच्या अंगप्रत्यांगांना पुरुषांच्या कामुक नजरा केवळ एक शरीर म्हणून बघतात.

मनोरंजन म्हणून अशिक्षित महिलेच्या शरीराचे शोषण फक्त यातून अभिप्रेत होत असतं.शेवटी प्रश्न हा उरतो की या मधून आम्ही यातून कुठे जाणार आहोत आणी काय साध्य करणार आहोत.या प्रकाराला काळाची गरज म्हणून बघितल्या जावे  की फिल्म निर्मात्यांची आणि प्रेक्षकांची बौद्धिक दिवाळखोरी समजावे?

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments