Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआत्महत्यांचा बोजवारा?

आत्महत्यांचा बोजवारा?

ब्बल 1 कोटी 37 लाख एवढी प्रचंड लोकसंख्या असलेला आपला विशाल हेभारत देश. आपल्या या देशात आत्महत्यांचा अहवाल भयानक आणि डोळ्यांत अंजन घालणारा आहे. वेगवेगळ्या राज्यातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आत्महत्यांचे प्रमाण आणि दर भिन्न आहेत. 2019 साली झालेल्या एकूण 1 लाख 39 हजार आत्महत्यांपैकी 93 हजार 16 एवढ्या संख्येत झालेल्या आत्महत्या 18 ते 45 वयोगटातील तरुणांनी केलेल्या आहेत. हे प्रमाण 67 टक्के एवढे आहे. यांतील 34 टक्के म्हणजेच 31 हजार 7 शे 25 आत्महत्या कौटुंबिक कारणातून झालेल्या आहेत. तसेच 7.3 टक्के म्हणजेच 7 हजार 2 शे 93 एवढ्या आत्महत्या फुस लावुन झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे यातील 7 टक्के म्हणजेच 6,491 एवढ्या आत्महत्या मानसिक आजारातून झाल्या. मादक पदार्थांचे सेवन आणि व्यसन असल्या कारणाने 5.6 टक्के अर्थात 5,257 एवढ्या आत्महत्या झाल्या. शिवाय 5.2 टक्के अर्थात 4,919 एवढ्या आत्महत्या प्रेम प्रकरणांतून झाल्या. कौटुंबिक नैराश्यातून होणार्‍या आत्महत्या प्रकरणात पुरूषांची संख्या अधिक आहे, हे महत्वपूर्ण होय. कोविड -19 च्या महामारीच्या काळात कथित आत्महत्यांच्या वृद्धी दराचा अहवाल डोळे उघडणारा आहे. लॉकडाउनमुळे झालेल्या एकूण 140 आत्महत्या संबंधी एकूण 24 आत्महत्याविषयी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. यावर्षी 14 जून रोजी हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा त्याच्या बांद्रा येथील अपार्टमेन्टमध्ये फासावर लटकलेला आढळला. त्याचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की काय, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचा अद्याप तपास सुरु आहे. मात्र त्याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला. नैराश्य, चिंता, मानसिक तनाव, अवेळी जेवण खावन, अवेळी झोप इत्यादी बाबी किशोरवयीन मुलांत खूप घटक सिद्ध होताना दिसतात. हे वयच विचित्र असते. याच वयात किशोरवयीन मुलांत शारीरिक व मानसिक बदल होत असतात. त्यांच्या भावना विकसित होत असतात. हीच बाब किशोर वयीन मुलींमध्ये देखील आढळून येते. या वयात जर त्यांचे योग्यप्रकारे प्रबोधन झाले नाही तर त्यांच्यातही मानसिक तनाव वाढून आत्महत्येस बळी पडण्याची शक्यता असते. त्यातही आईवडिलांच्या अवास्तव अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर टाकण्यात येते. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किशोर वयीन मुले जिवाचे रान करीत असतात. मात्र यात यश मिळाले नाही तर मात्र ते प्रचंड मानसिक तणावास बळी पडतात. यातून होणार्‍या आत्महत्यांचे प्रमाण 17.8 एवढे आहे.

और फिर किशोर हिट। यह वह जगह है जहां निराशा आई। राष्ट्रीय अपराध ब्यूरोच्या अहवालानुसार, 2019 साली दररोज 38 आत्महत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. किशोर वयीन मुलांच्या पात्रतेचे मानक अगर मापदंड हे त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील गुणवत्तेच्या आधारावर करणे आणि यावरून त्यांची लायकी ठरविणे, हे पूर्णतः चुकीचे असून यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण वाढतो. यामुळे सुद्धा आत्महत्यांचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे प्रेमभंग होणे, शारीरिक व मानसिक उत्पीडन, व्यसनाधीनता इत्यादी बाबींमुळे देखील आत्महत्यांची शक्यता वाढते. यासारख्या अनेक बाबींवर स्वतः पालकांनी देखील बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. आपला मुलगा अगर मुलगी काय करीत आहे. ते कोणत्या अवस्थेत आहेत. जेवताना आनंदाने जेवतात का? रात्री लौकर घरी येतात का? कुटुंबात हसत खेळत वावरतात का? रात्री लौकर झोपतात का? सकाळी वेळेवर उठून दिनचर्येत सहभागी होतात का? कुटुंबातील सर्वांशी हसून खेळून वागतात का? आणि हे सर्व काही आलबेल नसेल तर मात्र पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी करावी, हे निश्चित. आपली मुले गुपचूप गुपचूप असतात, जेवण बरोबर घेत नाही, चिडचिड करतात, रात्री अपरात्री घरी येतात, काही तरी विचारमग्न असतात, त्यांच्यात होणारा बदल आपण समजून घ्यायलाच तयार नसतो, आपण आपल्या व्यवसाय व इतर धावपळीत त्यांच्या कडे लक्षच देत नाही, आणि अचानक काहीतरी अनर्थ घडतो.

खरे तर त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्या भावना उघडमनाने समजून घ्या, संकोचाच्या सर्व भिंती तोडून टाका, वडीलधारी असण्याचा अहंकार पायदळी तुडवून त्यांच्याशी बोलते व्हा, त्यांचा पूर्ण विश्वास संपादन करा. या अख्ख्या जगात फक्त तुम्हीच त्यांचे खरे हितचिंतक आहात, हे त्यांना पटवून द्या. त्यांच्या जीवनात घडत असलेल्या प्रत्येक बदल आणि घटनेवर बारीक लक्ष ठेवून त्यांना बोलते करत त्यांचे योग्य मार्गदर्शन करा. सम्भाव्य संकटाचा एखादा इशारा मिळताच त्यावर तात्काळ प्रबोधन करून वेळीच उपाय करा. आपल्याने जमत नसेल तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या.

निश्चितच आईवडिलांचे प्रेम आणि भावनिक मातृत्व व पितृत्व आपल्या मुलांना निसर्गतःच हवे असते आणि आपण आजच्या या धावपळीच्या युगात त्यांना देण्यासाठी कमी पडतो आणि याचा परिणाम भयानक होतो, हे मात्र समजून घेण्याची गरज आहे.

आपली मुले आपले सर्वस्व असून आपण करीत असलेली भौतिक प्रगती ही त्यांच्याच भवितव्यासाठी करतो, असा आपण विचार निश्चित करतो. मात्र केवळ संपत्ती मिळवून त्यांना भौतिक सुख देण्याच्या उद्देशाने होत असलेल्या प्रयत्नापेक्षा त्यांना भावनिक आधाराची गरज असते, हे ही तितकेच महत्वाचे आहे. आपल्या देशात कोरोना रोगाव्यतिरिक्त झालेल्या आत्महत्यांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे. राष्ट्रव्यापी लॉकडाउनत्यामुळे देशातील जनतेत आलेल्या नैराश्यातून झालेल्या आत्महत्या संबंधी अहवाल डोळ्यात अंजन घालणारा आहे. नॅशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरो 2019 च्या अहवालानुसार, आपल्या देशात दररोज सरासरी 381 आत्महत्या होतात. बेरोजगारी, कर्जबाजारी, गरिबी, आर्थिक संकट, एकाकीपणा, स्वातंत्र्याची गळचेपी, मानसिक दबाव, प्रेमभंग, अपेक्षाभंग संक्रमित अथवा एखाद्या असाध्य रोगामुळे मृत्यूची भीती, आपल्यावर आणि इतरांवर होणार्‍या अत्याचार, आर्थिक, मानसिक, शारीरिक, लैंगिक शोषण व अन्यायाची चीड, तसेच यातून लागणारे दारू, मादक पदार्थ आणि ड्रग्स इत्यादींचे व्यसन हे यां मोठ्या प्रमाणातील आत्महत्यांचे मूळ कारण होय. लॉकडाउनमुळे लोकांच्या जीवनात अभूतपूर्व बदल झाले आहेत. ‘रिबूटिंग 2020: अ स्टोरी ऑफ कोविड-19 अँड शिफ्टिंग पर्सेप्शन’ च्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशभरात तब्बल 61 टक्के लोकांना या लॉक डाऊनच्या काळात मानसिक स्वास्थ्य आणि यासारख्या इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आज या मुद्द्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. याव्यतिरिक्त आपले जवळचे नातलग, सगेसोयरे मेल्याचे आणि दुरावण्याचे अपार दुःख कष्ट सोसावे लागत आहे. त्यात अफवा आणि अतिशयोक्तीने भरलेल्या माहिती प्रसाराने आणखीनच भर घातली आहे. लॉकडाऊनच्या काळात यासारख्या अडचणी वाढल्याने नैराश्य आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेचा आगडोंब उसळला. परिणामी माणसाच्या प्रवृत्तीत हिंसकता निर्माण झाली आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी सारख्या प्रमुख लोकांना देखील आज मानसिकरित्या मदतीची गरज निर्माण झाली आहे. 47 टक्के स्वास्थ्य कर्मी अशाप्रकारच्या मदतीसाठी हाक देताहेत, असेही एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

स्वास्थ्य सेवा पुरविणाऱ्या कार्यकर्त्यांत नैराश्याचा दर 50 टक्के, चिंतेचा दर 45 टक्के आणि अनिद्रा दर 34 टक्के, असा अहवाल चीन सारख्या देशात जियांबो ली और यिंग वांग यांच्या संशोधनातून आढळून आले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू , दिल्ली आणि गुजरात सारख्या राज्यांत ही स्थिती आणखीनच बिकट आहे. लॉक डाऊनच्या सुरुवातीलाच अनेक स्वास्थ्य कर्मींनी मास्क, पीपीई इत्यादींच्या तुटवड्याची ओरड केली होती. शिवाय त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची देखील ओरड केली होती. यातून त्यांच्यावर प्रचंड मानसिक तनाव वाढला होता. अशा परिस्थितीत काम करणे आणि सेवा बजावणे त्यांच्यासाठी खूपच अवघड झाले होते आणि आजही अवघडच आहे. यातून देखील आत्महत्या नावाचा गंभीर पर्याय समोर आला. यानंतर वित्तीय संकट, बेरोजगारी आणि पैशांची चणचण सारख्या अडचणींनी अक्षरशः जगणे मुश्किल करून सोडले. लॉकडाउनच्या सुरुवातीला संभाव्य मृत्यूच्या भितीने अक्षरशः थैमान घातले आणि यातूनही बर्‍याच आत्महत्या होण्याची संख्या भली मोठी आहे. तसेच लॉकडाउन नंतर शेकडो किलोमीटर दूर आपल्या घरी जाण्याच्या धडपडीत अनेक आत्महत्या घडल्या. दारूची दुकाने उघडल्यावर मात्र यांचे प्रमाण अधिकच वाढले. या बाबींचा आज गांभीर्याने विचार करून वेळीच उपाय योजना करण्याची गरज आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments