Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखजॉर्ज फर्नांडीस या वादळाचा अंत 

जॉर्ज फर्नांडीस या वादळाचा अंत 

भारताचे वरिष्ठ पत्रकार जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस, जे भारतीय कामगार संघटनेचे सदस्य होते, नंतर देशसेवा करण्यासाठी राजकारणात सामील झाले. फर्नांडिस १९४९ मध्येकोंकणी युवक” (कोंकणी युवक) या कोंकणी भाषेतील मासिकाचे संपादक होते. त्याच वर्षी ते कन्नडमधील साप्ताहिकरायथवानीचेसंपादक म्हणून देखील कार्यरत होते. ’द डॉकमनया इंग्रजी साप्ताहिकाचे बंद पडलेले प्रकाशन देखील १९५२५३ मध्ये फर्नांडिसच्या संपादनाखाली पुन्हा सुरु झाले. फर्नांडीस यांनीव्हाट एइल्स द सोशलिस्ट्स ‘(१९७२), ‘सोश्यालीस्ट कम्युनिस्ट इंटरॅक्शन इन इंडियाअशी राजकारणावरील अनेक पुस्तक लिहिली शिवायइन द इयर ऑफ ड डीसेबल्ड : इंडियास दिसेबल्ड गवर्नमेंट(१९८१)’, ‘डिग्निटी फॉर ऑल: एसेज इन सोशियालीझ्म अँड डेमक्रसी’(१९९१) आणीजॉर्ज फर्नांडिस स्पीक्स’ (१९९१) हे त्यांचे आत्मचरित्र देखील लिहिले. ते इंग्रजी मासिकद अदर साइडचेसंपादकही होते आणिप्रतिपक्षया हिंदी मासिकाच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्षही होते. मानव अधिकार कार्यकर्ते, फर्नांडिस अॅमनेस्टी इंटरनॅशनल, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे देखील ते  सदस्य होते. फर्नांडिस कोंकणी, इंग्रजी, हिंदी, तुलु, कन्नड, मराठी, तमिळ, उर्दू, मल्याळम आणि लॅटिन १० भाषांमध्ये निष्णात होते. कोकणी ही त्यांची मातृभाषा होती. तुरुंगात असतांना त्यांनी मराठी आणी उर्दूवर प्रभुत्व मिळवले आणि तरुणवयात चर्चमध्ये ते लॅटिनभाषा शिकले. हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे निखालस प्रभुत्व होते.

ते जनता दलाचे प्रमुख सदस्य होते आणि समता पक्षाचे संस्थापक होते. दूर संचार , उद्योग, रेल्वे आणि संरक्षण यांसारख्या अनेक मंत्रालयात ते मंत्रीपदी राहिले. ते एक असे दुर्मिळ राजकारणी होते जे कुठल्याही धनसंचय किंवा कुठल्याही लोभाविना जगले. खासदार म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळात  जॉर्ज फर्नांडिस यांनी दूरदर्शन केंद्र, कांती थर्मल पॉवर स्टेशन आणि रोजगार निर्मितीसाठी लिज्जत पापड कारखाना मुजफ्फरपूर येथे स्थापन केले . फर्नांडिस यांनी महिला सक्षमीकरणावर जोर दिला. नोव्हेंबर २०१४ मध्ये कांती थर्मल पॉवर स्टेशनचे नावजॉर्ज फर्नांडिस थर्मल पॉवर स्टेशन ‘ (जीएफटीपीएस) असे ठेवले गेले.

१९७७ मध्ये आणीबाणी उठल्यानंतर, फर्नांडिस  बिहारमधील मुजफ्फरपूर मतदारसंघातून जिंकले आणि त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपन्यां आयबीएम आणि कोका कोला यांना त्यांच्या गुंतवणूकीच्या उल्लंघनामुळे देश सोडण्यास भाग पाडले. १९८९ पासून १९९० पर्यंत रेल्वे मंत्री म्हणून कार्यरत असताना कोकण रेल्वे प्रकल्पाला मार्गी लावण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्ध संपल्यानंतर भारताने पोखरण येथे आण्विक चाचणी केली तेव्हा एनडीए सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते . फर्नांडिस तेव्हा बराक मिसाईल स्कॅण्डल आणि तहलका प्रकरणांसमेत विविध विवादांमध्ये वेढले गेले होते. विवादांच्या घेऱ्यात जॉर्ज फर्नांडीस यांनी १९६७ ते२००४ पर्यंत नऊ लोकसभेची निवडणूक जिंकली. तहलकाच्याऑपरेशन वेस्ट एन्डया स्टिंग ऑपरेशनमध्ये  भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी बंगारू लक्ष्मण, समता पार्टीच्या सरचिटणीस आणि फर्नांडीस यांच्या सहकारी जया जेटली सह फर्नांडीसचे नाव देखील गोवले गेले. या घोटाळ्यामुळे संपूर्ण भारतभर गोंधळ उडाला आणि फर्नांडीस यांना संरक्षणमंत्र्याचे पद सोडण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त न्यायमूर्ती फुकन यांच्या अध्यक्षतेखाली एकल व्यक्ती आयोगाने त्यांना या प्रकरणात क्लीनचीट दिली .समितीने या प्रकरणाची तपशीलवार तपासणी केली परंतु न्यायमूर्ती वेंकटस्वामी यांनी या प्रकरणात अहवाल सादर करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यांच्या कारकीर्दीत  वैयक्तिक आणि राजकीय जीवनात अनेक खाचखळगे आणि वळणं आली परंतु त्यांनी आपले काम चालू ठेवले.

मूळचे मंगलोरचे असलेले फर्नांडिस १९४६ मध्ये बंगळुरू येथे चर्चचे पाद्री म्हणून प्रशिक्षित झाले होते. तथापि १९४९ मध्ये ते मुंबईला स्थायिक झाले, जेथे ते सोशलिस्ट ट्रेड युनियन चळवळीत सामील झाले. कामगार संघटनेचे नेतृत्व करणारे फर्नांडिस यांनी १९५० आणि १९६० च्या दशकात भारतीय रेल्वेवर काम करताना अनेक संप आणि बंद घडवले. १९६७ च्या संसदीय निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एस. के. पाटील यांना पराभूत केले. फर्नांडिस १९७५च्या आणीबाणीच्या काळात भूमिगत झाले आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याविरीधात ते सतत लढा देत राहीले, परंतु १९७६ मध्ये बडोदा डायनामाइट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. त्यांचे सामाजिक जीवन अनेक चढ उतारांनी व्यापलेले होते तर वैयक्तिक आयुष्य देखील एक संघर्ष कथा होती.

फर्नांडीस कोलकाताहून दिल्लीला परतत असतांना माजी केंद्रीय मंत्री हुमायूं कबीर यांची कन्या लीला कबीर यांच्याशी भेट झाली .संयुक्त सोशलिस्ट पार्टीचे तत्कालीन सरचिटणीस म्हणून तेव्हा कार्यरत असलेले फर्नांडिस बांगलादेशातून परत येत असताना लीला कबीर रेड क्रॉस सोसायटीच्या सहाय्यक संचालक म्हणून युद्धभूमिवरून परतीच्या वाटेवर होत्या . त्यांच्या भेटीगाठी आणि २२ जुलै १९७१ रोजी विवाह केला. त्यांना शॉन फर्नांडिस हा मुलगा असून तो न्यूयॉर्कमध्ये स्थित एक गुंतवणूकदार आहे. त्यांचे विवाहित जीवन अगदी कमी काल टिकले. फर्नांडीस आणि कबीर १९८०च्या  मध्यात वेगळे झाले. १९८४ पासून जया जेटली फर्नांडिस यांच्या सहकारी म्हणून काम करीत होत्या ते लिव इन नातेसंबंधात होते परंतु लीला कबीर त्यांच्या जीवनात परतल्यामुळे जया आणि फर्नांडिस यांच्यातील संबंध खराब झाले. तब्येतीसाठी सतत त्यांचा संघर्ष सुरु राहिला. फर्नांडिस अल्झाइमर आणि पार्किन्सनच्या आजारांनी ग्रस्त होते आणि लीला कबीर त्यांच्या जीवनात परत आल्यानंतर जानेवारी २०१०  मध्ये हरिद्वार येथील बाबा रामदेवच्या आश्रमात लीला कबीरच्या विनंतीवर उपचार केले. फेब्रुवारी २०१० मध्ये फर्नांडिस यांच्या भावांनी त्यांच्या वैद्यकीय उपचार आणि भेटीसाठी न्यायालयाकडे धाव घेतली होती. तकबीर आणि शॉन फर्नांडीस यांनी फर्नांडिसना जबरदस्तीने अज्ञात स्थानावर हलवल्याचे बोलले जाते

जुलै २०१० मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने फर्नांडिस कबीरबरोबर राहतील आणि फर्नांडिस यांचे भाऊ त्यांची भेट घेऊ शकतात असा निर्णय दिला. ऑगस्ट २०१२ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने  जया जेटली यांना त्यांच्या भेटीसाठी परवानगी दिली आणि त्यांच्या पत्नीने यास विरोध केला. त्यांचे वैयक्तिक आयुष्य अनेक वर्ष ठळकपणे सार्वजनिक रित्या बातम्यांमध्ये  झळकत राहिले शेवटी त्याचे वैयक्तिक आयुष्याचे लोकांना विस्मरण झाले . ते विसरल्या गेले आणि विस्मरणात गेलेले फर्नांडिस ८८ वर्षे जगले. त्यांना नुकतीच स्वाइन फ्लूची  बाधा झाली होती आणि दिल्लीतील त्याच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments