Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदुर्बल बाल कलाकार आणि विशेष उपाय

दुर्बल बाल कलाकार आणि विशेष उपाय

 

 

 

 

 

 

 

नेक बालकलाकार माझ्या संपर्कात आहेत. काही तर माझ्या खूपच जवळचे आहेत. काहीं दिवसांपूर्वीच माझ्या एका युवा मित्राने व्हॉट्स्अॅप वर एक व्हीडियो मेसेज पाठविला. जीवन पूर्णतः ठप्प झाले आहे, असा त्यात संदेश देण्यात आला होता. शेवटी कोणती चिंता त्यास भेडसावत आहे? त्याची विचारपूस करण्यासाठी मी त्यास बोलावून घेतले. ये दुनिया, ये महफ़िल…, मेरे काम की नहीं, अशा आशयाचे उत्तर दिले त्याने. शेवटी, जाऊदे, नको घेऊ जास्त मनावर!, अशा शब्दांत मी दिलासा दिला. एका तासानंतर परत त्याचा फोन आला, म्हणाला… अहो! जवळच माझे वडील होते, त्यामुळे मनमोकळेपणाने बोलता आले नाही. मी देखील सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद दिला आणि त्याच्या काळजातल्या वेदनांना सूर गवसला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी लागलेल्या लॉकडाऊनपासून आजपर्यंत किती किती किती अरिष्ट सोसावे लागले, याची दुःखद कहाणी त्याने सांगितली. माझे डोळे अक्षरशः डबडबले. किती काळजी होती त्यास या छोट्याशा वयात आपल्या आईवडिलांची! पाहीलच काय त्याने अद्याप!! त्याचे वडील असाईनमेंटचे त्याच्या माथी मारतात. पण त्यात त्या बिचार्‍याचा दोष काय? मी त्यास धीर दिला.

चित्रपट आणि टी व्ही उद्योगात आजघडीला उद्भवणाऱ्या प्रश्नांवर त्याच्या आईशी चर्चा केली. मात्र इथूनच खर्‍या अर्थाने मला अतिशय तीव्र जाणीव झाली, ती या उद्योगातील बाल कलाकारांच्या घुसमटत्या अवस्थेची. मला राहवले गेले नाही. मी सारासार विचार करून सर्वच मुलांना बोलावून घेत आणि इथून मात्र खरी सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्याशी जवळीक असलेली ही मुले. त्यांत बरेच जण चौदा ते पंधरा वयोगटातील आहेत. त्यातील अनेकांना अज्ञात भय आणि चिंता भेडसावत आहे. मुळात हे वयच अतिशय नाजूक, भावूक आणि संवेदनशील असते. या वयात त्यांना दया माया आणि सहानुभूतीची गरज असते. या वयात त्यांना जर शाळा नसेल, मित्र मैत्रिणी नसतील, सभोवतीच्या वातावरणात बागडायला मिळत नसेल, तर याचा खूप विपरित परिणाम त्यांच्या मन मस्तिष्कावर होत असतो. ती तणावग्रस्त होतात. पिंजर्‍यातील बंदिस्त चीमनीसारखी तडफडत असतात. त्यांच्यात चिडचिडेपणा बळावत असतो. याचा त्यांच्यासोबत सर्वांनाच त्रास सोसावा लागतो. मात्र आपण त्यांच्या प्रसिद्धीमुळे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करतो. यात या सर्व अडचणींवर मात करून पुढे जाणार्‍या मुलांची संख्या नगण्यच.

हा अडचणीत सापडलेला युवा वर्ग, खरे तर याला विशेष मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. मनोरंजन क्षेत्रातील मुलांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, हे नितांत गरजेचे आहे. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे, सहानुभूती देणे, प्रेमाने वागवणे, यां सारख्या बाबी नितांत गरजेच्या असून यांस प्रमुख महत्व देण्याची गरज आहे. खरे तर आज चित्रपट उद्योगातील वित्त प्रणाली पार बदलून गेली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राने यात घुसखोरी केलेली आहे. अनेक बालकलाकार भरघोस कमाई करतात आणि अनेक जण केवळ प्रसिद्धीच्या ध्यासात काम करतात. कामाच्या मोबदल्याचा पैसा उदरनिर्वाहासाठी खर्च होतो. या दिवसांत मनोरंजन उद्योगाने चांगलीच उसळी मारली आहे. 2018 साली 25 टक्क्यांचा वाढ दर इतर विकसित दराच्या द्वितीय क्रमांकावर होता. 2019 साली टी व्ही मनोरंजन जगतात 10 बिलियन पेक्षा अधिक उत्पन्न होण्याची शक्यता होती. 2016 साली भारत सरकारतर्फे बालश्रम अधिनियमात में संशोधन करून बाल कलाकारांचे अधिकार मान्य करण्यात आले. बालश्रम संशोधन अधिनियम 2016 मध्ये बालकलाकार या शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे. यात क्रिडा, खेळ, अभिनय,, गायन, चित्रकला इत्यादी कोणत्याही प्रकारच्या छंदात समाविष्ट कलेशी संबंधित मुलांचे काम संबोधले जाते. बालकलाकारांच्या श्रम, रोजगार आणि मोबदला यां सारख्या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. एनसीपीआरसी चे नियम बालकलाकारांच्या अधिकाऱांबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहेत. बाल कलाकार अथवा कलाकार वेळेनुसार प्रभावित होत असतात. त्यामुळे त्यांची क्रियाशीलता दुबळी होत जाते. कधी कधी तर त्यांना रस्त्यावर येण्याची पाळी येते. त्यांच्यातील आकर्षण संपल्यावर संकटांना सामोरे जावे लागते. बालकलाकार निरागस असतात. त्यांच्यात व्यावहारिकता खूप कमी प्रमाणात असते. यासाठीच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी वेळीच पाउल उचलणे महत्वाचे ठरेल.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments