Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसत्तेसाठी ज्योतिरादित्यांची उडी!

सत्तेसाठी ज्योतिरादित्यांची उडी!

ज्योतिरादित्य सिंधियांनी १८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये १७ वर्ष खासदारकी, केंद्रात मंत्रीपद भोगले. परंतु मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे काँग्रेसचा हात सोडला. भाजपचे कमळ हाती घेतले. भाजपचा कमळ धरल्यानंतर पक्षाने राज्यसभेची बक्षीसी दिली. विशेष म्हणजे केंद्र सरकारवर टीका करणा-यांना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये कामाचा दृष्टीकोन दिसून आला. काँग्रेसमध्ये तरुणांना संधी नाही असा आरोपही ज्योतिरादित्य सिंधियांनी केला. परंतु इतके पद भोगल्यानंतर न्याय मिळत नाही हा आरोप न पटणारे आहेत. शेवटी राजकारणात सर्व काही वज्र आहेत. पक्ष निष्ठा आणि सेवा या सर्व गोष्टी ऐकायला चागंल्या वाटतात. शेवटी सत्ता हीच अंतिम आहे त्यामुळे ज्योतिरादित्य यांनी आता पर्यंत कुटुंबाची परंपरा कायम ठेवली आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा १ जानेवारी १९७१ ला माधवराव सिंधिया यांच्या कुटुंबात ज्योतिरादित्य यांचा जन्म झाला. अफाट संपत्तीसह त्यांना राजकीय वारसादेखील मिळाला. २००१ मध्ये मैनपुरीमध्ये वडिलांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य यांना राजकारणात यावे लागले. २००२ पासून त्यांनी आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल टाकत २००२ ते २०१४ पर्यंत चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली.२०१९ मध्ये त्यांना गुना मतदारसंघातून भाजपच्या केपी सिंह यादव यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्योतिरादित्य हे राहुल गांधीच्या टीम मधील अत्यंत विश्वासू चेहरा होता. मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराच्या जोरावर काँग्रेसला यश मिळवून दिले. परंतु मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षामुळे काँग्रेस विरुध्द बंड पुकारला. बंडाची ही परंपरा त्यांच्या कुटुंबात आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य यांच्यासाठी काही नवीन नाही.

स्वतंत्र भारताच्या राजकारणामध्ये राजघराण्यांच्या राजकीय वर्तुळात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-गुनाच्या सिंधिया कुटुंबाची कहाणी अतिशय रंजक आणि गुंतागुंतीची आहे. या कहाणीमध्ये भारतीय राजकारणातील ते डावपेच पाहायला मिळताता जे खुर्चीच्या संघर्षासाठी वापरले जातात. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कान्हेरखेड गावचे पाटील जानकोजीराव यांचे वंशज आजपर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत २७ वेळेस खासदार आणि आमदार राहिले आहे. आकडेवारी आणि अनुभव असे दर्शवतात की राजमाता ते ज्योतिरादित्यपर्यंत या सत्तेमध्ये या कुटुंबाच्या महत्त्वाकांक्षा पक्षांवर ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणून भारी पडल्या आहेत.

१८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर वडिलांच्या ७५ व्या जयंतीदिवशी ज्योतिरादित्य यांनी भाजपात प्रवेश केला. सिंधिया कुटुंबाच्या ‘राजकारणाच्या कहाणीत’ एक नवीन अध्याय जोडला जाणार आहे. सिंधिया यांच्या या निर्णयाचे सिंधिया कुटुंब आणि सदस्यांनी स्वागत केले आहे. सिंधीया कुटुंबातिल व्यक्ती आणि राजकीय प्रवास आपण बघितला तर १९५७ ते २०२० चा प्रवास, ५ पक्षांचे राजकारण या विषयी जाणून घेऊ. विजया राजे या काँग्रेस, जनसंघ, जनता पार्टी, भाजप (८ वेळा खासदार)  १९५७-गुना –काँग्रेस, १९६२-ग्वालियर –कांग्रेस, १९६७-गुना -अपक्ष (पोटनिवडणूक), १९७१-भिण्ड -जनसंघ

१९८९-गुना –भाजप, १९९१-गुना –भाजप, १९९६-गुना –भाजपा, १९९८-गुना –भाजप, तर माधवराव सिंधीयांचा प्रवास  जनसंघ,काँग्रेस,मप्र विकास काँग्रेस असा होता. (९ वेळा खासदार) १९७१-गुना –जनसंघ, १९७७-गुना –अपक्ष, १९८०-गुना –काँग्रेस,१९८४-ग्वालियर –काँग्रेस, १९८९-ग्वालियर –काँग्रेस, १९९१-ग्वालियर –काँग्रेस, १९९६-ग्वालियर -मप्र विकास काँग्रेस, १९९८-ग्वालियर –काँग्रेस, १९९९-गुना –काँग्रेस, वसुंधरा राजे भाजप (५ वेळा खासदार, ५ वेळा आमदार) , १९८४ – भिंड – भाजप (पराभव) १९८९ ते २००४ – झालावाडमधून भाजपच्या तिकीटावर सगल ५ वेळा खासदार, १९८५ -२०१८ मध्ये ५ वेळा आमदार. तसेच यशोधरा राजे भाजप (५ वेळा आमदार, १ वेळा खासदार), १९९८ – शिवपुरी –भाजप, २००३ – शिवपुरी –भाजप, २००७- ग्वालियर लोकसभा (पोटनिवडणूक) –भाजप, २०१३ आणि २०१८ – शिवपुरी –भाजप असा प्रवास होता. तर ज्योतिरादित्य काँग्रेसमध्ये असताना (४ वेळा खासदार) २००२-गुना – काँग्रेस (पोटनिवडणूक), २००४-गुना – काँग्रेस, २००९-गुना – काँग्रेस, २०१४-गुना – काँग्रेस असा प्रवास आहे. आता ते भाजपवासी झाले असून भाजपच्या कोट्यातून ते राज्यसभेत एन्ट्री करणार आहेत.

राजमाता विजयाराजे यांचा राजकीय प्रवास

देशातील राजघराण्यांच्या विलयानंतर राजमातेचे पती जीवाजीराव यांनी स्वातंत्र्य भारतात सिंधिया कुटुंबाचा मान वाढवला. त्यादरम्यान काँग्रेस सर्व देशात पसरली होती, पण जीवाजीराव यांना राजकारणापेक्षा आपल्या राज्याला सांभाळण्यात जास्त रस होता. अनेक काँग्रेस नेत्यांच्या विनंतीनंतर ते आपली पत्नी राजमाता विजयाराजे यांना राजकारणात उतरवण्यासाठी तयार झाले. चार मुली आणि एक मुलगा माधवराव यांची आई विजयाराजे यांनी पहिल्यांदा १९५७ मध्ये गुना मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.

माधवराव सिंधिया यांचा राजकीय प्रवास

विजयाराजेंच्या सक्रिय करिअरदरम्यान त्यांचे पुत्र माधवरावदेखील राजकारणात उतरले. १९७१ मध्ये आईच्या पाऊलावर पाऊळ टाकत ते गुना मतदारसंघातून जनसंघाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि सलग १९९९ पर्यंत ९ वेळा खासदार बनले. त्यांच्या आईंनी चार पक्षातून आपली राजकीय वाटचाल वाढवली तर मुलगा माधवराव यांनी जनसंघ, अपक्ष, काँग्रेस आणि स्वतःच्या मप्र विकास काँग्रेस पार्टी स्थापन करुन राजकारण केले.

वसुंधरा राजेंचा राजकीय प्रवास

राजमाता विजयाराजे यांची चौथी संतान आणि माधवरावांपेक्षा ८ वर्षे लहान वसुंधरा यांनी आईसोबत राहून भाजपमध्ये गेल्या आणि १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भिंडमधून निवडणूक लढवली. पण, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशात काँग्रेसला भावनिक राजकारणातून मतदान मिळाले आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर वसुंधरा यांनी आपले सासर राजस्थानकडे मोर्चा वळवला आणि धौलपुर, झालरापाटन आणि झालावाडमध्ये सक्रिय होऊन भाजपची वाढ केली. वसुंधरा सिंधिया कुटुंबातील एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी पाच वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

यशोधरा राजेंचा राजकीय प्रवास

सिंधिया कुटुंबातील सर्वात लहान मुलगी यशोधरा यांचा राजकीय प्रवास खूप लहान आहे. स्वभावाने शांत यशोधरा वसुंधरा राजेंपेक्षा एक वर्ष लहान आहेत, पण पक्षात असूनही त्यांचा राजकीय प्रवास वेगळा आहे. त्यांची गिनती राज्यातील मोठ्या नेत्यामध्ये केली जाते, पण सक्रिय नसल्यामुळे मोठ्या पदावर जागा मिळू शकली नाही. यशोधरा राजेंनी शिवपुरीमधून १९९८ आणि २००३ मध्ये दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली. शिवराज सरकारमध्ये त्यांना उद्योग आणि वाणिज्य मंत्रालय सांभाळण्याची जबाबदारी मिळाली.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राजकीय प्रवास

१ जानेवारी १९७१ ला माधवराव सिंधिया यांच्या कुटुंबात ज्योतिरादित्य यांचा जन्म झाला. अफाट संपत्तीसह त्यांना राजकीय वारसादेखील मिळाला. २००१ मध्ये मैनपुरीमध्ये वडिलांच्या निधनानंतर ज्योतिरादित्य यांना राजकारणात यावे लागले. २००२ पासून त्यांनी आपल्या वडिलांच्या पाउलावर पाऊल टाकत २००२ ते २०१४ पर्यंत चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली.२०१९ मध्ये त्यांना गुना मतदारसंघातून भाजपच्या केपी सिंह यादव यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments