Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख...तरच महिलांचा सन्मान!

…तरच महिलांचा सन्मान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी सोशल मीडिया सोडू इच्छितो, अशा प्रकारचे ट्विट सोमवारी रात्री केले होते. सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली होती. पंतप्रधानांच्या ट्विटनंतर थोड्याच वेळात #NoSir #NoModiNoTwitter टॅगसह ट्रेंड करायला लागलं. तर काही खोचक प्रतिक्रियाही उमटल्या. मंगळवारी सकाळीही हा टॉप ट्रेन्ड होता. हा हॅशटॅग वापरून चाहते पंतप्रधानांना सोशल मीडियातून बाहेर न पडण्याची विनंती केली. दुपारी पंतप्रधानांनी पुन्हा ट्विट करुन आपण सोशल मीडिया सोडणार नसल्याचे स्पष्ट करत ‘यु टर्न’ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्तानं सोशल मीडियाद्वारे एक नवीन उपक्रम जाहीर केलाय. आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे. आम्हाला जीवन आणि कार्यातून प्रेरणा देणा-या महिलांकडे मी माझा सोशल मीडिया अकाऊंटस् सोपवून देईन असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी म्हटले. जनतेने प्रेरणादायी महिलांच्या कथा मला कळवाव्यात असे आवाहनही मोदी यांनी केले. परंतु प्रश्न हा उपस्थित होतो की त्या प्रेरणादायी महिला कोण, मोदी सोशल मीडिया अकाऊंटस् देतील. परंतु देशातील अत्याचारग्रस्त महिलांच्या समस्या सुटतील त्याच दिवशी महिलांचा खरा सन्मान होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या आवाहानानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाविरोधात बोलणा-या सामाजिक कार्यकर्त्या स्वरा भास्कर, पत्रकार बरखा दत्त यांच्याकडून कधीही प्रेरीत होणार नाही अशा प्रतिक्रियाही व्यक्त केल्या. देशात ब-याच सामाजिक संघटना आहेत. त्यांच्या माध्यमातून महिला सामाजिक कार्य करतात आपल्या प्रेरणेतून त्या स्वत:ला झोकून देतात. अशा महिलांच्या कथा कळवा असं पंतप्रधानांनी ट्विटव्दारे आवाहन केले आहे. एकीकडे महिलांच्या प्रेरणादायी कार्य आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. पंतप्रधान मोदी मन की बात करतात परंतु त्याने प्रश्न सुटणार नाही. महिलांच्या समस्या, महिलांचे हाल आणि आजही महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही. महिला वर्गाचा मतदान हा महत्वपूर्ण मानला जातो. विशेष म्हणजे ह्या त्या महिला आहे ज्या मतदानातून निकालाची दिशा बदलतात. त्यांचे मतदान संपूर्ण निकाल पालटून टाकतात. स्वतः महिलांशी संवाद साधला पाहिजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. महिलांनी नरेंद्र मोदींचे जबरदस्त समर्थन केले आहे, ४६ टक्के महिलांनी भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षांना मतदान केले होते, तर कॉंग्रेसला २७ टक्के आणि इतर पक्षांना २७ टक्के लोकांनी काही मतदान केले होते. याची जाणीव पंतप्रधान नरेद्र मोदींना असायला हवी. मोदींच्या विरोधात किंवा धोरणा विरोधात कुणी ब्र सुध्दा काढला तर भाजपचे कार्यकर्ते, आयटीसेलचे कर्मचारी महिलांवर टीका करतात. शिवीगाळ करतात. सोशल मीडियावर एका प्रकारे युद्धासारखी परिस्थिती निर्माण करतात. मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा त्याग करण्याचा विचार करण्याच्या घोषणेने. दिल्लीतील दंगलीच्या वेळी भडकलेल्या धोकादायक अफवांच्या झुंबडानंतर मोदींनी सोशल मीडिया बंद करण्याची खेळी केली अशीही चर्चा झाली.

देशाची राजधानी दिल्लीत निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकरण घडले. हैदाराबादमध्ये एक डॉक्टर तरुणीवर अत्याचार व हत्याकांड घडले. अशा अनेक घटना समाजात घडत आहेत. एका प्राध्यापिका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून नराधमाने पेट्रोल टाकून जाळले. त्यामध्ये प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. अशा अनेक घटना घडतात. महिलांवर अत्याचार होतात. त्याचाही बंदोबस्त होणे गरजेचे आहे. देशातील अत्याचार झालेल्या महिलांवरील खटले निकाली काढले पाहिजे. तरच महिलांचा ख-या अर्थाने सन्मान होईल. परंतु महिलादिनी महिलांची आठवण येते. त्यानंतर महिलांचा आणि त्यांच्या समस्यांचा विसर पडतो. महिलांचा दिवस त्यांच्या कृत्यांसाठी वैयक्तिक पातळीवर नव्हे तर स्त्रीत्वासाठी ओळखण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. तो दिवस आहे जेव्हा सर्व राष्ट्रे, वांशिक, संस्कृती, राजकीय आणि आर्थिक पार्श्वभूमीवरील स्त्रिया एकत्र येऊन महिलांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढवतात. बलात्कार करणार्यांमना शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे, हिंसाचारावर अंकुश ठेवावा. आपल्या मातृभूमीत आपण सुरक्षित असायला पाहिजे. आमचे मूलभूत हक्क आम्हाला मिळालेच पाहिजे असे प्रत्येक स्त्रिला वाटते. सोशल मीडिया अकाऊंट देण्याऐवजी भारतीय महिलांना आत्मविश्वास मिळाला पाहिजे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments