Thursday, April 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखप्रताप सरनाईकांचा बळी जाईल?

प्रताप सरनाईकांचा बळी जाईल?

रिक्षाचालक ते नगरसेवक,नगरसेवक ते तिस-यांदा आमदार असा प्रवास करणारे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक. अधिकृत 125 कोटीचे मालक आहेत. बेनामी संपत्ती किती आहे हे माहित नाही. प्रताप सरनाईक सध्या ईडीच्या कचाट्यात अडकले आहेत. परंतु त्यांच्याकडील गडगंज संपत्तीचे मालक शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आहेत अशी लोकांमध्ये चर्चा आहे.

प्रताप सरनाईक मुळचे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातले. परंतु त्यांनी ठाण्यात येऊन आपले प्रस्थ निर्माण केले. परंतु त्यांच्या डोक्यावर मातोश्रीचा हात आहे. त्याच्याशिवाय ते शक्य नाही. प्रताप सरनाईकांकडे असलेल्या मालमत्तेचे खरे सुत्रधार वेगळेच आहेत. शिवसेनेने भाजपापासून फारकत घेतल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये वाद विकोपाला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उध्दव ठाकरेंच्या मालमत्तांचे सातबारा मीडियासमोर आणले. उध्दव ठाकरेंचा मालमत्तेचा व्यवसाय आहे का? अन्यव नाईक कुटुंबियांचे त्यांचे आर्थिक व्यवहार झाले त्याबाबत शंका उपस्थित केली. उध्दव ठाकरेंच्या पत्नींच्या नावे दोन नव्हे चार नव्हे तब्बल 30 सातबारे सोमय्यांनी समोर आणले.

उध्दव ठाकरेंची संपत्ती ही प्रताप सरनाईकांच्या नावे आहेत असा सूर विरोधकांकडून लावला जात आहे. सरनाईकांच्या कंपन्यांमध्ये उध्दव ठाकरेंचा पैसा गुंतवल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो अशी चर्चा आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत प्रताप सरनाईकांची एवढी मालमत्ता आली कुठून? विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून प्रताप सरनाईक 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत. यासोबतच घोडबंदर रोडला मानपाड्याजवळ प्रताप सरनाईक यांचे विहंग्ज इन हे थ्री-स्टार हॉटेलही आहे. विहंग्ज ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी आहे. यामध्ये स्विमिंग पूल, हेल्थ क्लब, जाकूझी आणि स्क्वॅश अशा विविध व्यवसायांमध्ये गुंतवणूक आहे त्याचे धागेदोरे हे मातोश्रीला जोडलेले आहेत असा आरोप त्यांच्याविरोधकांकडून केला जातो.

प्रताप सरनाईकांच्या व्यवहारांमध्ये जो काही पैसा आहे तो उध्दव ठाकरेंचा आहे अशी शंका भाजपच्या नेत्यांना आहे. त्यामुळे नाईकांची चौकशी झाली म्हणजे खरे सुत्रधार सापडतील असा अंदाज बांधला जात असली तरी त्यांना बळीचा बकरा बनवला जाईल. राजकारणात ह्या गोष्टी काही नवीन नाही. विशेष म्हणजे काँग्रेसमध्येही ह्या गोष्टी  घडलेल्या आहेत. उत्तरप्रदेशमधून मुंबईत पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले कृपाशंकरसिंह मुंबईत भाजी विक्रीचा व्यवसाय करता आणि थेट महाराष्ट्राच्या मंत्रीपदार्यंत मजल मारतात. कोट्याशिध होतात. त्यांच्याही चौकशा झाल्या. कृपाशंकरसिंह हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यावेळी त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आला. राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांच्याविरुध्द गाडीभर पुरावे असताना छगन भुजबळ यांना अडकवण्यात आले. भुजबळ अडीचवर्ष तुरुंगात राहिले. त्यामुळे शिवसेनेतही हाच तर प्रकार नाही ना?असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रताप सरनाईकांचा जन्म वर्ध्यामध्ये झाला 65 वर्षांचे सरनाईकांची आज देशात चर्चा सुरु आहे. लहानपणीच वर्ध्यामधून मुंबईत स्थाइक झाले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. डोंबवली पूर्वेतील एस. व्ही. जोशी शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरनाईकांनी काही काळ रिक्षाही चालवली. यानंतर त्यांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्यत्तव घेत सक्रीय राजकारणात उडी घेतली. 1997 साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर 2008 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. 2008 मध्ये सरनाईकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले. प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदार आहेत.

हेही वाचा l  Coronavirus Guidelines l केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स, परिस्थितीनुसार निर्बंध लादण्यास सूट

प्रताप सरनाईक यांचा विहंग ग्रुप या नावाने अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यांनी 2019 साली निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांची एकूण (स्थावर आणि जंगम एकत्रित) मालमत्ता 125 कोटींहून अधिक असल्याची नोंद आहे. प्रताप सरनाईकांचे सर्व व्यवहार अधिकृत, पारदर्शक असतील तर ते ईडीच्या कचाट्यातून सुटतीलही. परंतु इतरांच्या पापाचे ओझे त्यांच्या माथी मारण्याचे कटकारस्थान तर नाही ना? गेल्या काही दिवसांपासून सरनाईक हे चर्चेत आहेत. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोट प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी यांना आवाज उठवत विरोध केला होता.

 शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. मुंबई यासोबतच ठाणे परिसरातील एकूण 10 ठिकाणी ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. त्यामुळे त्यांना अडकवण्या प्रयत्न आहे की त्यांना त्यांच्यावरील वचपा काढला जात आहे. कारण अर्णब गोस्वामी प्रकरणात त्यांनी रिपब्लिक आणि भाजप नेत्याचे थेट संबध जोडले होते. त्याअनुषंगाने तर कारवाई ना?अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments