Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखआंबेडकरांचा अल्टिमेटम!

आंबेडकरांचा अल्टिमेटम!

भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडेंना आठ दिवसात अटक करा, अन्यथा मंत्रालयाला घेराव घालू असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला. कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे गुरुजी आरोपी आहे. दुसरा आरोपी मिलिंद एकबोटे सध्या तुरुंगात आहे. मात्र भिडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना पाठिशी टाकण्याचे कारस्थान सरकारकडून होत आहे. भिडे हे मोकाट फिरत आहेत. पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र सरकारची मेहरनजर असल्यामुळे भिडे सध्या मोकाट आहेत. खरतर गंभीर आरोप असतांना सरकारने आरोपीला पाठिशी घालणे संतापजनक आहेत. सरकार दोन समाजात तेढ लावण्याचे काम करत आहेत. असा आरोप जर सरकारवर होत असेल तर सरकारने या प्रकरणी पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. कोणतीही हिंसा ही समर्थनीय नाही. परंतु जर भावना भडकावुन समाजा समाजात दंगली लावण्याचे काम केल जात असेल तर ते चिंताजनक आणि लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. तीन महिण्यापासून भिडेंना अटक होत नाही. निष्पाप लोकांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. परंतु ज्यांनी दंगली पेटवली ज्यांच्यावर आरोप आहेत. त्या भिडें विरुध्द पुरावे आहेत. अस जर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप असेल तर तो गंभीर आहे. याचाही सोक्षमोक्ष होणे गरजेचे आहे. मोर्चे काढून समाजा समाजात दंगली लावण्याचे काम होत आहेत. एल्गार मोर्चा काढून सरकारला जाव विचारला जात आहे. संभाजी भिडेंना अटक करण्यापूर्वी आधी रावसाहेब पाटीलला अटक करावी. पाटीलने फेसबुकवरुन हिंसाचाराबाबत पोस्ट केली होती, असा आरोपही आंबेडकर करत आहेत. हिंसाचारात बळींचा अपेक्षित आकडा गाठता आला नाही, अस पोस्टमध्ये म्हटले होत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. भिडेंविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल असतांना त्यांना पाठिशी घालण्याचे काम सरकारकडून होत असेल तर सरकार कुणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. सरकारला तेढ निर्माण करुन राज्य आणि देश चालवायचे आहेत का हा खरा प्रश्न आहे. आंबेडकर यांनी एक नव्हे अनेक इशारे दिले आहेत. मोदीशी भांडायचे नाही. पण कारवाई झाली नाही तर कोणत्या शेपटीवर पाय ठेवायचा आणि कोणतं प्रकरण कधी बाहेर काढायचे हे आम्हाला देखील समजते, असा सुचक इशाराच आंबेडकर यांनी दिला. भिडेंविरोधात पुरावा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण त्यांच्याविरोधात ठोस पुरावे आहे, असा दावा जर खरा ठरत असेल तर यातून सत्य परिस्थिती बाहेर आली पाहिजे. परिस्थिती आता चिघळत चालली आहे. सरकारने दोषींना पाठिशी न घालता कारवाई करायला हवी अन्यथा राज्यात,देशात दंगली उसळतील हे सरकारने वेळेवर समजून घेणे गरजेचे आहे.

वैदेही ताम्हण
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments