Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाचा ‘नोटांवर’ डल्ला

भाजपाचा ‘नोटांवर’ डल्ला

च्छे दिनच्या बाता मारणाऱ्या सरकारने नोटा गायब करुन जनतेला बेहाल करण्याचा पराक्रम केला. एटीएमध्ये नोटांचा खडखडाट असून स्वत:च्याच पैशांसाठी नागरिकांना भटकावे लागत आहेत. नीरव मोदी, मेहुल चौकशी यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करुन विदेशात पोबारा केला. तर दुसरीकडे एएटीमध्ये खडखडाट असल्यामुळे ज्यांना एटीमधून पैसा काढून खरेदी करायचं,व्यवहारापासून मुकावे लागत आहे. सरकार अच्छे दिनाच्या नुसत्याच बाता मारुन जनतेच्या पैशांचा वापर कर्नाटकच्या निवडणूकांमध्ये तर करणार नाही ना? यापूर्वी वेगवेगळ्या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाने पैसा ओतून निवडणूका जिंकल्याचा आरोप झाला होता. तसेच नुकताच भाजपाचा वर्धापदिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात करण्यात आली. देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष म्हणून भाजपाने बाजी मारली. भाजपाचे एक वर्षात वार्षिक १०३४ कोटी रुपये उत्पन्न होते. उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले. २०१५- १६ च्या तुलनेत २०१६- १७ मध्ये भाजपाचे उत्पन्न ४६३.४१ कोटी रुपयांची वाढले. २०१५- १६ मध्ये भाजपाचे उत्पन्न ५७०. ८६ कोटी रुपये इतके होते. तर हेच प्रमाण २०१६- १७ मध्ये थेट १०३४. २७ कोटी रुपयांवर पोहोचले. अहवालातून स्पष्ट झाले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सात राष्ट्रीय पक्षांचा अहवाल नुकताच जाहीर केला होता. भाजपाकडे एवढा पैसा आला कुठून. त्यांनाच एवढी लक्ष्मी कशी काय लाभली. नोटाबंदीच्या काळातही दोन हजार रुपयांसाठी नागरिकांना लाईनीत उभ राहवं लागत होत. परंतु त्याचवेळी लाखो कोटी,रुपये भाजपाच्याच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांकडे सापडत होते. आताही काहीसा संशय घेण्यास हरत नाही. कारण कर्नाटकमध्ये भाजपा हा विरोधी पक्षात असून सत्ता हस्तगत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद, खर्च करुन सत्ता हस्तगत करायची आहे. वेगवेगळ्या सर्वेमधून कर्नाटकात भाजपाचा पराभव होणार असा सर्वेमधून समोर आले. पैशाच्या जोरावर निवडणूका जिंकणाऱ्या भाजपाने नोटा गायब केल्याची शक्यता आहे. तेलंगणा, वाराणसी,दिल्ली, हैदराबाद, महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट झाला आहे. खरतर गेल्या पाच सहा दिवसापासून हा तुटवडा जाणवत आहे. बुधवारी अक्षय्य तृतीया सारखा सण असून एटीएममध्ये खडखडाटाने नागरिकांना व्यवहार करने अवघड त्रासदायक होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणात नोटांचा तुटवडा नाही आहे. मग एटीएमध्ये टाकला जाणारा पैसा कुठे आहे. कुणाच्या तिजोऱ्यांमध्ये तो पैसा गेला. नेहमी जो पैँसा एटीएममध्ये टाकण्यात येत होता तो बंद का करण्यात आला. सरकारने जनतेच्या संतापाची वाट बघू नये. शेवटी जनतेच्या पैशावर सरकार डल्ला मारुन छळ करत आहेत. मात्र छळाच्या विरोधात बंड पुकारला तर सरकारची खुर्ची जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments