Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखभाजपाचे थोबाड फुटले!

भाजपाचे थोबाड फुटले!

‘सब का साथ सबका विकास’च्या तुताऱ्या वाजवणाऱ्या भाजपाला उत्तरप्रदेश,बिहार,पंजाब,राजस्थान,च्या पोटनिवडणूकीत मतदारांनी लाथाडले. भाजपाच्या व्देषाच्या राजकारणाला मतदार बळी पडणार नाही. हा संदेश निकालातून दिला. भाजपासाठी २०१९च्या रणसंग्रामासाठी धोक्याची घंटा आहे हा इशारा दिला. भाजपाने ‘सब का साथ सबका विकास’ चा नारा देऊन निवडणूका जिंकल्या. मात्र गेल्या चार वर्षात कोणताही विकास झाला नाही. नोटबंदीच्या निर्णय घेऊन देशातील जनतेला देशोधडीला लावले.दरवर्षी दोन करोड तरुणांना रोजगार देऊ वचन दिले होते परंतु चार वर्ष उलटले मात्र रोजगार उपलब्ध झाले नाही. नवीन उद्योग,व्यापार आले नाही. नोटबंदी नंतर लाखो नागरिकांचे रोजगार गेले. व्यवसाय ठप्प झाले. भाजपाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मुजोरी वाढली. दादागिऱ्या करुन धमकावून हम करो सो कायदे अशा तोऱ्यात कारभार चालला आहे.समाजा समाजात दंगली भडकविण्याचे काम भाजपाची मंडळी करत आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेते याला खतपाणी घालत असल्यामुळे नंगानाच चालू आहे. उत्तरप्रदेशचा विचार केला तर पाच दिवसा नंतर योगी आदित्यनाथ सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. पंरतु उत्तरप्रदेशमध्ये योगी यांनी एन्कांउटर आणि हिंदु मुस्लिम दंगली शिवाय दुसरे कोणतेही ढोस काम केले नाही. बेरोजगारी,विकास या गोष्टींकडे कोणतेही लक्ष नाही. दररोज भाजपाचे मंत्री, तसेच धार्मिक तेढ निर्माण होईल अशी विधाने करत आहेत. खुद्द योगी यांनी मी हिंदू आहे मी ईद साजरी करत नाही असे विधान केले होते. कधी ताजमहाल वरुन तर कधी लव्ह जिहादच्या नावाने तेढ निर्माण करण्याचे काम या मंडळींनी केले. सप्टेंबर २०१७ मध्ये हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन नसल्यामुळे शेकडो निष्पाप मुलांचा जीव गेला. डॉक्टरांवर कारवाई करुन सरकार मोकळे झाले परंतु तेथील जनतेची हळहळ यांना लागली. कारण आज पोटनिवडणूकीतून जो गोरखपूर आणि फुलफूर मतदार संघातून निकाल आला तो निकाल भाजपाच्या थोबाडीवर बसला. कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या त्या जागा होत्या आणि दोन्ही जागांवर भाजपाला पराभव पत्कारावा लागला. जनतेने दाखवून दिले वर्षभरात जो भाजपाने उत्तरप्रदेशमध्ये उच्छाद मांडला त्याने विकास होणार नाही. ज्या मतदारांनी भरभरुन मत दिली. ज्या जांगावर भाजपाला निवडून दिले होते त्याच जागांवर त्यांचा पराभव केला. भाजपाचा बुरुज ढासळला. बिहारमध्येही भाजपाला पराभव पत्कारावा लागला. भाजपाने या पोटनिवडणूकीच्या निकालातून धडा घेण्याची गरज आहे. कारण युपीएच्या माध्यमातून विरोधकांनी मोट बांधण्याचे काम सुरु केले आहेत. एकुण २० पक्षांनी आता पासून दंड थोपटल्याने भाजपाला २०१९ चे युध्द सोपे नाही. हे वेळेवर समजण्याची गरज आहे. मात्र आजच्या निकालावरुन भाजपाचा भ्रमाचा भोपळा फुटला. व सुधरण्यासाठी हा इशारा दिला.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments