Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखशिवसेनेच्या मुळावर घाव!

शिवसेनेच्या मुळावर घाव!

पुरोगामीचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात भर दिवसा अहमदनगर मध्ये शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांना भरचौकात गोळ्या घालून ठार मारण्यात आले. थरकाप उडवणारी ही संतापजनक घटना घडाली. भाजपा एकीकडे युती असल्याचे दाखवत आहेत,दुसरीकडे शिवसेनेच्या मुळावर घाव घालण्याचे धंदे भाजपा करत असल्याचा आरोप शिवसेनेचे पर्यावरण मंत्री कदम यांनी केला. अहमदनगरचा उत्तरप्रदेश झाला. मुख्यमंत्र्यांच हे अपयश आहे. असाही आरोप कदम यांनी केला. अहमदनगरमध्ये दुहेरी हत्याकांडांमुळे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची अब्रु गेली. भर दिवसा राजकीय वैमनस्यातून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. ही घटना महाराष्ट्रासाठी खूप चिंता करण्याची आहे. कायदा सुव्यवस्थेचे धिंधोडे उडाले. राज्यकर्ते षंड बनले. लायकी नसणाऱ्यांच्या हातात जेव्हा कारभार येतो त्यावेळी वाईट अवस्था होते. त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे. या हत्याकांडात भाजपा आमदार शिवाजी कर्डीले,राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप यांची नावे समोर आली. यांनीच सुपारी दिल्याचा आरोप होत आहे. केडगावच्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने एकत्र येत सेनेला शह दिला. भाजपाने नावाला उमेदवार उभा केला. भाजपाने नावापुरता उमेदवार उभा केला. हे सर्व प्रकरण संघटितपणे केले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मागणी कदम यांनी केली. परंतु ज्या दोन शिवसैनिकांचे जीव गेले त्यांचे काय? अहदनगरमध्ये तणाव आहे. तणाव महाराष्ट्रासाठी,देशासाठी आता नवीन गोष्ट उरली नाही. दररोज या ना त्या कारणाने राज्यात तनाव निर्माण होत आहेत. जातीय दंगली, हत्या, बलात्कार, दरोडे, मोर्चे, उपोषण, अशा घटना घडत आहेत. शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली.  एकीकडे भाजपा युतीच्या गप्पा मारत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचाच काटा काढण्यात येत आहे. तर शिवसेनेच्या काही सत्तापिपासू नेत्यांना भाजपा सोबत युती हवी आहे. तर काही शिवसेना नेत्यांचा त्याला विरोध होत आहे. भाजपा नेते हे युतीसाठी लाचारी पत्करुन शिवसेनेला डोक्यावर घेण्यासाठी लोटांगण घालत आहेत. निवडणूका जवळ येत असल्यामुळे एकमेकांचे खुलेआमपणे काटे काढण्यात येतील. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक दंगली घडवू शकतात असा आरोप केला होता. परंतु सध्या ज्या हत्या,खून,बलात्कार होत आहेत त्याचं काय? मुख्यमंत्र्यांनी स्वत: गृहखात आपल्याकडे ठेवून शहाणपणाचे दर्शन घडवले. राजकीय वैँमनस्यातून जर दिवसाढवळ्या हत्या होत असतील तर हा कसला पुरोगामी महाराष्ट्र? महाराष्ट्राला संताची भूमी म्हटलं जातयं.परंतु जर असे खून होत असतील तर हा महाराष्ट्र उत्तरप्रदेश बनला असा जर आरोप सत्ताधारी पक्षातील पर्यावरण मंत्री कदम करत असतील तर ते योग्यच. गुंडांच्या हातात सत्ता जाते त्यावेळी कुणावर कुणाचही वचक राहत नाही त्यामुळे असं हत्याकांड समोर येतात. मात्र शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची जी हत्या भाजपाच्या आमदाराकडून घडविण्यात आली असा आरोप होत आहे तर तो शिवसेनेच्या मुळावर घाव आहे. शिवसेनेने यातून काही तरी धडा घ्यायला हवा. जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्याने कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. तर आणि तरच.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments