गुजरात विधानसभा निवडणूक मतदानासाठी २९ दिवस शिल्लक असतांना भाजपा अंतर्गत बदल करुन वेगळी खेळी खेळत आहे. खरतर निवडणूका जिंकणे आणि सत्ता हस्तगत करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते आणि त्यात गैर असे काहीही नाही. कारण निवडणूका या सत्ता हस्तगत करण्यासाठीच लढवल्या जातात. परंतु ‘एक बुथ टेन युथ’ चा फंडा बदलून आता ‘एक बुथ थर्टी युथ’ या रचनेनुसार गुजरातमध्ये तयारी केली. कारण भाजपाला पराभवाची मोठी भीती येथे निर्माण झाली. व्यापारी,पाटीदार आंदोलन, दलीत हत्या प्रकरणावरुन तसेच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद बघता भाजप अंतर्गत खचून गेली आहे. भाजपाने अख्खे मंत्रीमंडळ तसेच इतर भाजपाचे राज्य असलेल्या ठिकाणचे मुख्यमंत्री,मंत्री कामाला लावले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह खुद्द तळ ठोकुन बसले. शाह स्वत: तळ ठोकून बसल्यामुळे भाजपाने ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांचे गुजरात हे होम पीच असल्यामुळे त्यांना गुजरात कोणत्याही परिस्थिती ताब्यात ठेवायचे आहे. गुजरातची लढाई भाजपाने प्रतिष्ठेची बनवली. काँग्रेसने आपले पूर्ण पत्ते उघडले नाही. भाजपाने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करुन टाकल्या मात्र त्यामध्ये बरेच जुनेजानते कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ज्या उमदेवारांचे पत्ते कापण्यात आले त्यांनीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. तर ज्यांना तिकिट देण्यात आले त्यांच्याही विरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारले. भाजपामध्ये सुरु गोंधळ हा काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो. काँग्रेस उमेदवार देतांना कोणताही वाद किंवा बंडखोरी होऊ नये याची वरिष्ठांकडून काळजी घेण्यात येत आहे. पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दीक पटेल यांची जवळपास आतापर्यंत काँग्रेस सोबत सर्वच मुद्यांवरुन सकारात्मक चर्चा झालेली आहे. पाटीदार आंदोलनातील नेत्यांनी त्यांचे पत्ते पूर्णपणे उघडले नाही. पाटीदार नेते हे काँग्रेसच्या बाजूने झुकते माप देत आहेत परंतु तिकिटावरुन ते आज काहीही बोलायला तयार नाही. एक बुथ थर्टी युथ तयार करुन भाजपा वेगळी खेळी केली. मात्र भाजपा अंतर्गत राजकारणामुळे भयभित,चिंताग्रस्त आहेत एवढे मात्र नक्की.
- Advertisement -
- Advertisement -