Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकमळाबाईचा ‘मुका’ पांचट!

कमळाबाईचा ‘मुका’ पांचट!

मळाबाई अर्थातच भाजपाने शिवसेनेचा मुका जरी घेतला तरी युती नाही अशी घोषणा शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली. परंतु भाजपाला शिवसेनेची युतीची गरज का पडली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. चक्रे उलटे फिरले की,आसपासच्या मंडळींची आपल्याला आठवण येते. अशीच आठवण भाजपवाल्यांना शिवसेनेची आली. मोदी लाट ओसरने सुरु झाले आहे. केंद्रातील मित्रपक्ष एक एक करुन एनडीएतून बाहेर पडत आहेत. केंद्रातील ताकद कमी होत असल्यामुळे राज्य आणि केंद्रातील मित्र पक्ष हा हातून जाऊ नये म्हणून भाजपाने शिवसेनेपुढे लोटांगण घालण्याचे काम चालू केले आहे. नुकताच भाजपाचा ३८ वा वर्धापनदिन सोहळा बीकेसीवर पार पडला. या सोहळ्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह म्हणाले होते की, भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं, याकडे लक्ष देऊ नका, पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं मुनगंटीवार विरोधकांना उद्देशून म्हणाले होते. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. पण सत्ता आमचीच येणार, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना हाणला होता. आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचं आम्ही बघून घेऊ. काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९ मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्यामुळे एकत्र आलात. आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ, असं प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिलं. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. राज्यात व केंद्रात आता पतंप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचा जनाधार प्रचंड घसरला आहे. भाजपला जनाधार विकत घ्यावा लागतो. ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना विकतच घेतात. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकात पाटील हे पैशाचा पाऊसच पाडतात. भाजपचे हे पैशाचे राजकारण फार काळ टिकणार नाही. अशी टीका शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. शिवसेनेचे नेते भाजपावर चौफेर टीका करत असतांना भाजपाला शिवसेनेबद्दलचा प्रेम ऊतु आले. भाजपा विरोधात वातावरण तयार झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी शिवसेनेला गांडूळ म्हटले होते. परंतु पवारांच्या उत्तराला भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वकिली केली होती. चंद्राकांत पाटील त्यांच्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी म्हणाले होते की, शिवसेना आणि भाजपचे सरकार उत्तम सुरू आहे. शिवसेनेचे काम चांगले असल्याचे प्रमाणपत्र पाटील यांनी या वेळी दिले होते. शिवसेनेला वारंवार डिवचण्याचे काम भाजपाकडून होत असते असा आरोप शिवसेनेकडून केला जातो. तर दुसरीकडे शिवसेने सोबत घरोबा करण्यासाठी भाजपा अतीउत्साही झाली आहे. मात्र शिवसेना कोणत्याही प्रकारे भिक न घालता स्वबळाची भाषा करत असतांना भाजपाने लाचारी सोडणे आवश्यक आहे. भाजपाचा मुकाही शिवसेनेला नकोसा झाल्यामुळे भाजपाने लाचारी पत्कारु नये. व स्वबळावर निवडणूका लढवून आपली ताकद दाखवावी. अन्यथा लाचारीपणाच भाजपाचा पराभव करुन टाकले एवढे मात्र निश्चित.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments