Thursday, March 28, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखमराठीचे दुश्मन!

मराठीचे दुश्मन!

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पहाते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी….”

आज मराठी भाषा गौरव दिन. मात्र मराठीच्या नावाने सत्ताभोगणाऱ्या तथाकथीत सत्ताधाऱ्यांना मराठीचा तिरस्कार आहे. मराठीवर खोटं प्रेम दाखवणारे हे मराठीचेच खरे दुश्मन बनले आहेत. कारण मराठी भाषेच्या दिनादिवशीच मराठी भाषेच्या गौरव गीतातील कडवे वगळण्याचा मस्तवालपणा सत्ताधाऱ्यांनी केला. मराठी गौरव गीतातील शेवटचे कडव वगळण्यात आलाय. हा संताप जनक प्रकार आहे. विरोधक संतापले परंतु सत्ताधाऱ्यांना याची थोडीही लाज वाटली नाही. मराठीचे आणि महाराष्ट्राचे आपणच होलसेल ठेकेदार आहोत अशा अर्वीभावात वावरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मराठीचा एवढा तिरस्कार का? असा प्रश्न पडतो. कवी सुरेश भट यांनी लिखीत गौरव गीतातील वरील कडवं वगळण्यात आलयं. हे कडवं खूप छान होत आणि मराठीचा सन्मान करणाराच कडव होतं. जर विरोधी पक्षातील नेते याबद्दल सरकारला जाब विचारत होते तर त्यांच कुठ चुकलय. आज अर्थसंकल्पीय आधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, “आपण कामकाज गुंडाळून मराठी भाषेच्या गौरवासाठी चर्चा घ्या. मराठी भाषेच्या दिनादिवशीच मराठी भाषेच्या गौरव गीतातील कडवे का वगळले. हा झालेला प्रकार गंभीर आहे. सरकारने मराठीचा अपमान केला आहे.”  राज्याच्या आस्मितेला धक्का लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आग्रह विखे पाटील यांनी धरला. यात काय चुकलयं. तुम्ही कडवे का वगळले?” असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. यावर आक्रमक होत मुख्यमंत्र्यांनी उलट प्रश्न केला. मुख्यमंत्री म्हणाले, “जयंतराव हा अधिकार तुम्हाला कोणी दिला. तुम्ही कोण, तुम्हाला काय आधिकार हे विचारायचा?” परंतु मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त करायची नव्हती. मुख्यमंत्री येथे चुकलेच. सरकारने माफी मागावी म्हणून विरोध आक्रमकम व्हाव लागतं. याचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधक एकत्र झाल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना कामकाज स्थगित करावं लागतय. किती ही शोकांतीका महाराष्ट्रासारख्या मराठी राज्यातच मराठीसाठी लोकप्रतिनिधींना आपली बाजू मांडतांना झगडावं लागतं. मंत्रालयीन विभाग व त्या अंतर्गत येणार्‍या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम घेणे बंधनकारक असते. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी भूमिका घेऊन शासनाने यंदा मराठीच्या तांत्रिक विकासात्मक उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने बोलू तसे टंकलेखन (स्पीच-टू-टेक्स्ट) करणार्‍या लिपिकावर व स्वरचक्र अशा अ‍ॅप्सद्वारे मोबाईलवर मराठी टंकलेखन करणे व संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित क रणे, अशा उपक्रमांची सूची ३ फेबुवारीच्या शासन निर्णयात दिलेली आहे; परंतु अनेक संस्थांनी ग्रंथपरिचय, व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा, काव्यवाचन, काव्यसंगीत सभा, असे पारंपरिक कार्यक्रम घेण्यातच धन्यता मानली. मराठी भाषेचा खरोखरच विकास करायचा असेल तर केवळ शासन नियमांची पूर्तता करणे योग्य ठरणार नाही. जानेवारी महिन्याचे पहिले १५ दिवस मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनातर्फे साजरा करण्याचा आदेश आहे. परंतु अनेक सरकारी कार्यालये आणि अधिकार्‍यांना यांनी दुर्लक्ष केलं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ! ही ओळ केवळ कविता म्हणून नाही तर आपले जीवन-सत्त्व आहे. यातील भाग्य हा शब्द केवळ मराठी बोलणा-या, असणा-या माणसासाठी आहे. ते मान्य करायलाच हवे. मराठी भाषा दिन. मराठी भाषेचा जागर करण्याचा दिवस. कुणीही अभिमान बाळगावा असा. मराठीचे प्रेम म्हणजे इंग्रजीचा दु:स्वास नाही. तिने एक बºयाच देशांशी संपर्क करण्याची भाषा म्हणूनच राहावे. जगाचं बोलणं समजण्यासाठी ती खिडकी आहे. परंतु खिडकी म्हणजे दार नाही तो दरवाजा कायम मराठीसाठीच राहणार आहे. मराठीच्या भवितव्याची काळजी करताना मराठी भाषा आणि शाळा हा कायम चिंतेचा विषय असतो. पण अलीकडे बहुसंख्य कार्यालये, त्यांची परिभाषा मराठीच होत असताना त्या गोष्टीकडे पहावे. म्हणजे महदाईसा महदंतचा धावा, धवळे, लीळाचरित्र मुकुंदराज, ज्ञानेश्वर ते फुले, शाहू, आंबेडकर या सर्वांनी मराठीला अतिशय कणखरपणे जपले, जोपासले, वाढविले. तिचे अभिजातपण अबाधित ठेवले. मराठी टिकेल न टिकेल हे गळा काढणे बंदच व्हायला हवे. आय.ए.एस.सारखी उच्च दर्जाची परीक्षा मराठीतून उत्तीर्ण होता येते. आपले संवादसाधन मराठीच असू शकते. या सगळ्या प्रगतीच्या खुणाच आहेत. कुसुमाग्रजांचा आत्मविश्वास वांझोटा नव्हता, नाही. फक्त डोळस प्रयत्न हवेत. अभिजात दर्जा मिळेल. मराठीचा अभ्यास फोफावेल ही आशा ठेवायलाच हवी तरच होकारार्थी मराठी महाराष्ट्र मराठी भारत आणि मराठी जग आपण पाहू शकू. परदेशातले लाखो मराठी बांधव हाच विश्वास जागवून आहेत. सत्ताधाऱ्यांनी फक्त राजकीय दुकानदारी चालविण्यासाठी मराठी मराठी न करता मराठीचा सन्मानच करायला हवं. तर आणि तरच.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments