Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखशेतकऱ्यांनो ‘आसूड’ ओढाच!

शेतकऱ्यांनो ‘आसूड’ ओढाच!

शेतकऱ्यांच्या जीवावर राजकीय सत्ता भोगणाऱ्यांकडून अन्नदाता शेतकऱ्यांचीच उपेक्षा होत आहे. करंट सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे शेतकरी रस्त्यावर आला. पाच,दहा मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून शेतकरी हवालदिल झाला. मागण्या खूप मोठ्या नाहीत. पण सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीत.  शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्याच्या नावावर कराव्यात,कोणत्याही अटी आणि शर्थी यांच्याशिवाय कर्जमाफी द्यावी,शेती मालाला दीडपट हमीभाव मिळावे,स्वामिनाथन आयोगातील रास्त शिफारसींची अंमलबजावणी करावी,वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी १२ मार्चला सोमवारी किसान सभेचा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. निवडणूकीच्या काळात सत्ताधारी भाजपाने त्यांना आश्वासन दिली. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने भाजपाच्या पारड्यात मतं दिली. भाजपा सत्तेत आलं आणि मागण्यांचा विसर पडलय. यासाठी वारंवार झगडाव लागत आहेत.
नाशिकहून निघालेला किसान मोर्चा उद्या सोमवारी विधान भवनावर आपल्या मागण्या घेऊन जाणार. विनाअट कर्जमाफीची प्रमुख मागणी आणि इतर अनेक मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाला सत्ताधारी शिवसेनेसह,मनसे,राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेसने पाठिंबा दिला. खरतर शिवसेना सत्तेत असून सुध्दा पाठिंब्याचा नाटक करत आहेत. शिवसेनेला शेतकऱ्यांचा कळवळा असता तर सत्तेला लाथ मारली असती परंतु शिवसेनेचे मंत्री,आदीत्य ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर जाऊन आम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा आहे असं दाखवल. पाठिंबा जाहीर केला. परंतु सत्तेत असलेल्या शिवसेनेला शेतकऱ्यांच्या काही देण घेण नाही. ढोंग रचून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकारातून हा मोर्चा काढण्यात आला. किसानसभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, राज्य अध्यक्ष किसन गुजर, सरचिटणीस अजित नवले या सगळ्यांचा या मोर्चात सहभाग आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. मोर्चेकऱ्यांची संख्याही वाढली आहे. किसान सभेचा लाल बावटा हाती घेऊन आणि लाल टोपी घालून शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देऊन, तसेच गाणी गाऊन आणि वाद्ये वाजवून सरकारचा निषेध केला. तळपत्या उन्हाची पर्वा न करता हा मोर्चा मुंबईत दाखल झाला. सरकार ने आश्वासनांची पूर्तता केली नाही. नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी वेळप्रसंगी बंदूकीच्या गोळ्या खाऊ अशी धमकी दिली. शेतकरी आता जीवावर उदार झाला आहे. शेतकऱ्याचे हाल होत आहेत. शेतकरी त्रस्त झाला आहे. सोमवार हा सरकारसाठी खून भयावह दिवस आहे. शेतकरी संतापला तर काय होऊ शकते. याची सरकारला जाणीव नाही.सरकारने सोमवारी मागण्या पूर्ण केल्या नाही तर सरकार विरोधात शेतकऱ्यांनो आसूड ओढा. सरकारला सत्तेतून बाहेर फेका तरच यांचे डोके ठिकाणावर येईल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments