Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखपत्रकारांचे कुटुंबीयही असुरक्षित!

पत्रकारांचे कुटुंबीयही असुरक्षित!

राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात भरदिवसा पत्रकार रविकांत कांबळे च्या आई,आणि मुलीच अपहरण करुन क्रुरपणे हत्या करण्यात आली. पत्रकारांचे कुटुंबीयही आता असुरक्षित झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीची मालिका सुरुच असून कायदा सुव्यवस्थेची ऐशी तैशी झाली आहे. लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ले होत असतांना त्यांच्या कुटुंबियांवरही हल्ले होत आहेत. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात २१८ पत्रकारांवर हल्ले झालेत. २०१५ मध्ये ७२,२०१६ ला ८२,२०१७ ला ५४ पत्रकारांवर हल्ले झाले. माध्यमांमध्ये विरोधात बातमी आली तर त्या पत्रकाराला किंवा संपादकांना धमक्या दिले जातात. हल्ले करुन हत्या केली जात आहे. राजकीय गुंड,अवैध व्यावसायीक,तसेच इतर चुकीची काम करणाऱ्या मंडळींच्या विरोधात बातम्या छापून आल्यानंतर किंवा वृत्तवाहीण्यांवर प्रसारीत झाल्यानंतर काही मंडळी पत्रकारांचा काटा काढण्याचे काम करतात. कारण त्या बातम्यांमुळे त्यांचे नुकसान होते. मात्र जे सत्य आहे ते समोर आणणे तसेच जे काही घडत आहेत त्यावर प्रकाश टाकणे, हे माध्यमांचे काम असल्यामुळे आज माध्यमांच्या पत्रकारांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचे काम होत आहेत. आज पत्रकारांना कोणतीही सुरक्षा नाही. नोकरीची तर सुरक्षा नाहीच नाही. त्यांना सवलती नाही. मिळणारा पगार तुटपुंजा. मोठा गंभीर आजार झाला तर उपचारालाही पैसा नसतो. अशा सर्व परिस्थितीत पत्रकार आज धावपळ करुन काम करतो. तर दुसरीककडे त्या पत्रकाराला जीव मुठीत घेऊन जगावं लागत. पत्रकाराचे आयुष्य आज असुरक्षित असून कोणत्या वेळी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही. खरतर नागपूर येथे पत्रकार कांबळे यांच्या आई आणि मुलीच्या हत्येने गुंडप्रवृत्तींनी आवहान दिले आहेत. गृहमंत्रीच्या नागपूरमध्ये अशी भयानक घटना घडत असेल तर पत्रकारांनी कस जगावं हाच खरा प्रश्न आहे. पत्रकारांवर हल्ले हे आता आम झाले आहेत. गुंडांना कायद्याचा धाक नाही. पत्रकारांवरील हल्ल्यांमुळे कठोर कायदे करा अशी मागणी होत असतांना सरकार कायदे करायला तयार नाही. सरकारला त्या कायद्यांची भीती आहे. कारण पत्रकार हे सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आणि भ्रष्टाचाराची जेंव्हा चीरफाड करतात त्यावेळी त्यांना गुंडाकडून धमक्या दिल्या जातात. काही वेळा सुपारी देऊन पत्रकारांचे गेम केले जाते. शेवटी पैसा आणि पावरच्या नावाने आरोपींची निर्दोश मुक्ताताही होते. शेवटी पत्रकार हा सर्वसामान्य असतो त्यामुळे त्याचे कुटुंबियांचा निभाव लागत नाही. परंतु कठोर कायदे झाले तर कुणाचीही हल्ले करायची हिंमत होणार नाही. शेवटी माध्यमांच्या प्रतिनिधींवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर होणारे हल्ले हे लोकशाहीसाठी घातकच आहेत.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments