Thursday, March 28, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखकरकरेच्या हत्येच्या अर्धवट तपासाची खंत!

करकरेच्या हत्येच्या अर्धवट तपासाची खंत!

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या २६/११च्या हल्ल्याला आज ९ वर्ष पूर्ण झाले. २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईत १० दहशतवाद्यांनी निष्पापांची कत्तल करत हाहाकार माजवला होता. यामध्ये १६६ निष्पाप नागरिक आणि सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. याच दिवशी मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांनाही गोळ्या झाडण्यात आल्या. जगात असं पहिल्यांदा झालं होतं की एका दहशतवाद्याला सुरक्षा यंत्रणांनी जिवंत पकडलं. हल्ल्याला ९ वर्षं झाले तरी त्या भयावह आठवणी, त्या जखमा अजूनही आहेत. जे गेले त्यांचं दुःख न विसरण्यासारखं आहे. दुर्दैवानं बहुतांश बाबींमध्ये याचं उत्तर नाही असंच येतं. २६ /११मध्ये जे पोलीस अधिकारी शहीद झाले होते, त्यांच्या स्मारकावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी शहिदांना आदरांजली वाहिली. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात पोलीस जिमखाना आहे. तिथे हे स्मारक उभारण्यात आलंय. दरवर्षी आदरांजी वाहिली जाईल. दिवस, वर्ष उलटतील परंतु हेमंत करकरे यांना कुणी मारले? त्यांना त्यावेळी कुणाचा फोन आला होता. त्यांचे मोबाईल कॉलरेकार्ड तपासात का घेण्यात आले नाही हे अजूनही अनुत्तरीतच आहे. मात्र करकरे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास लावत असतांना त्यांनी जी कामगिरी केली त्याचाच बदला घेण्यासाठी व सर्व प्रकरणातील मुख्य सुत्रधारांपर्यंत ते पोहोचत असतांना त्यांची हत्या झाली. मालेगाव २००८ चा तपास करत होते. त्यांच्या तपासाची माहिती देण्यापूर्वी जे स्फोट होत होते. त्यांना कशी प्रसिध्दी दिली जात होती हे सगळ्यांनाच माहित आहे. २००२ ते २००८ पासूनचा काळ आठवला तर देशात एक मोठा स्फोट होत होता. कित्येक निष्पाप लोकांचा बळी जायचा. माध्यमांमध्ये बातम्या यायच्या. ज्या दिवशी स्फोटाची बातमी येत होती त्याच दिवशी गुप्तचर विभागच्या हवाल्याने, जैशे मोहमंद,सिमी,लष्कर ए तोयबा, इंडियन मुजाहिदिन ने केले अशा संघटनांची नावे यायची. ही नावे गुप्तचर संघटनेच्या हवाल्याने केंद्रीय गृहखात नाव जाहीर करायचे. देशभरात वेगवेगळ्या यंत्रणा गुप्तचर संघटना चार पाच लोकांची नावे सांगायची आणि त्यांना अटक व्हायची. त्यांची चार्चशीट तयार व्हायची. सर्व बॉम्बस्फोट हे मुस्लिम करायचे अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती. परंतु या सर्व प्रकरणात हेमंत करकरे आले नसते तर खूप वाईट परिस्थिती झाली असती. जुन २००८ मध्ये करकरे एटीएसचे प्रमुख झाले. सप्टेंबर २००८ मध्ये दुसरा स्फोट मालेगाव मध्ये झाला आणि खराखुरा तपास सुरु झाला होता. गुप्तचर संघटनेने काही लोकांची नावे करकरे यांच्याकडे दिली. परंतु करकरे यांनी या लोकांची नावे आहेत पुरावे काय आहे? त्यांनी अटक करण्यास नकार दिला होता. बॉम्बस्फोट झाला त्यावेळी घटनास्थळापासून तपास केला. त्याठिकाणी एक मोटारसायकल त्यांना दिसून आली. त्या मोटारसायकलीचा तपास लावला त्यावेळी त्या  मोटार सायकलवर स्फोटके लादूनच स्फोट घडविण्यात आले हे करकरेंच्या लक्षात आले. आणि तपासाची चक्रे फिरली. मोटारसायकलीचा तपास लावला असता ती मोटार सायकल ही प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या मालकीची निघाली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर एक श्यामलाल शाहू, शिवनारायण कलंक, यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा धक्कादायक माहिती समोर आली होती ती म्हणजे या कटाचे सुत्रधार लेफ्टन कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, मेजर उपाध्याय हे होते.त्यांच्या सोबत असे एकुण ११ लोकांना अटक झाली होती. खरा सुत्रधार पुरोहित हा होता. या मध्ये तीन लॅपटॉप जप्त केले होते. दोन पुरोहित,एक पांडे यांच्याकडून जप्त केले. २००२ पासून एक कट्टरवादी संघटना तयार झाली ही धक्कादायक माहिती समोर आली. ती संघटना म्हणजे अभिनव भारत संघटना होती. ते इस्त्राइल, नेपाळ नागाबंडखोरांची मदत करत होते. त्या लॅपटॉपमध्ये सर्व माहिती होती. कर्नल पुरोहित कडे जो लॅपटॉप होता त्यामध्ये संघटनेची सर्व माहिती होती. तरुणांची भर्ती कशी करायची, त्यांना स्फोटके बनवायचे, तयार करायचे त्याची माहिती,त्यांना प्रशिक्षण देणारे,बॉम्बचे प्रकार, आरडीएक्सची माहिती,आर्थिक मदत करणारे कोण आहेत याची संपूर्ण माहिती होती. दयानंद पांडेच्या लॅपटॉप मध्ये जम्मू, इंदूर,नाशिक,देवळाली,पुणे,भोपाल,जबलपूर यासह इतर ठिकाणी बैठकांची माहिती होती. पांडे यांनी या सर्व सर्व ठिकाणी झालेल्या बैठकांचे ऑडीओ,व्हिडीओ चित्रीकरण केले होते. २८ व्हिडीओ,२८ ऑडीयो होते. त्यावेळी करकरे यांनी चित्रिकरणातील लोकांना बोलावून विचारपुस करुन संशास्पद वाटले तर अटक करायचे. परंतु व्हिडीओमध्ये जे चेहरे दिसत होते. यामध्ये काही साहित्यिककार,कलाकार,पत्रकार,राजकीय नेत्यांचा समावेश होता. नोव्हेंबर मध्ये, टाईम्स ऑफ इंडिया,इंडियन एक्सप्रेस मध्ये बातम्या आल्या होत्या. पुणे येथील दोन इतिहासकारांना चौकशीसाठी बोलावणार. अश्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी करकरे यांच्यावर वेगवेगळे दबाव आणण्यात आले. कुटुंबियांना मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. करकरे हे कशालाही जुमानले नव्हते. २००८ जानेवारी मध्ये फरिबाद येथे झालेल्या बैठकांमध्ये हिंदू राष्ट्र बनवण्यात अडथळा आणला तर त्याला ठार मारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. याच वेळी गुप्तचर यंत्रनेने करकरेंना मारण्याचे ठरवले. १८ नोव्हेंबर २००८ रोजी अमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणेने रॉला एक माहिती देऊन सांगितले की, पाकिस्तानची लष्करांची एक बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी येत आहे. बोट कराची पासून निघाली आहे. मुंबईत पाच दिवसात पोहोचतील तुम्ही दक्षता घ्या. रॉला ही माहिती कळाल्या नंतर अंतर्गत सुरक्षेची बाब म्हणून १९ नोव्हेंबर २००८ ला रॉने गुप्तचर यंत्रणेला दिली. रॉने ३५ टेलिफोनच्या नंबरची गुप्तचर यंत्रणेला यादी दिली. हे सर्व भारतीय कंपनीचे नंबर आहेत. तुम्ही ते टॅप करा. मात्र गुप्तचर यंत्रनेने अतिरेक्यांची इत्यंभूत माहिती मुंबई पोलिसांना कळवायला हवी होती. परंतु ती कळवली नाही. ज्या मार्गे बोट येत होती वेस्टर्न लेव्हल कमांड यांना सांगितली असती तर त्यांनी ती बोट मुंबई पोलिसांना उचलून आणून दिली असती. मात्र ती माहिती गुप्तचर यंत्रनेने कोस्ट गार्डला दिली. कोस्ट गार्डमधील एक महाराष्ट्रीय कर्मचाऱ्याने रात्रभर बोटचा शोध घेतला. परंतु त्या कर्मचाऱ्याला बोट दिसली नाही. त्या कर्मचाऱ्याने गुप्तचर संघटनेचे अधिकारी प्रभाकर आलोक यांना सांगितले की मला बोट दिसली नाही. तुम्ही मला लोकेशन सांगा वायरलेस केले परंतु अलोक यांनी सांगितले नाही. नेव्हीने इंटेलिजन्स एजन्सीला कळवले तेथे रवि नाडकर्णी नावाचे अधिकारी होते. त्यांनी बोट विषयी वरिष्ठांना सांगितले नाही आणि मुंबई पोलिसांना कळवले नाही. करकरे यांना मारल्यानंतर सांगितले की, मी विसरलो होतो. कारण त्यांनी अभिनव भारत च्या लोकांना सर्व हल्ल्याची माहिती दिली होती की,लष्कर हे तोयबाचे लोक ताज,निरीमन हाऊस,ओबेरॉय हॉटेलवर अटॅक करायला येणार आहे. गुप्तचर यंत्रनेने अभिनव भारत संघटनेच्या लोकांना सांगितले की, तुम्ही त्याचा फायदा घेऊन समांतर अटॅक करा. आम्ही करकरेला पाठवण्याची व्यवस्था करतो. तुम्ही त्यांना मारुन टाका. ताज,ओबेरॉयवर, साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास अतिरेक्यांनी हल्ला केला. त्याचवेळी सीएसटी,कामा,रंगभवन वर अटॅक करा. त्याच पध्दतीने हल्ला झाला. हा सर्व गृहखात्याच्या अंतर्गत चौकशीमधून समोर आले होते. रॉच्या लोकांनी या सर्व प्रकारानंतर त्यांनी संताप व्यक्त करत आम्ही माहिती दिल्यानंतर हे कसे काय घडले असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु करकरेंच्या हत्येमध्ये वायरलेस, अंतर्गत चौकशीचा रिपोर्ट घेणे महत्वाचा होता. तपासात घेतला नाही. कर्नल पुरोहित,पांडे यांच्याकडून जप्त केलेले लॅपटॉप तपासात घेतले नाही. करकरेला गल्लीत कुणी बोलावले याचाही तपासात समावेश नाही. खरतर साध्या गुन्ह्यांमध्ये किंवा खून प्रकरणात मोबाईल तपासतात. घेतात आणि खुन प्रकरण उघडकीस येतो. करकरे च्या प्रकरणात त्यांचा मोबाईल तपासात घेतला नाही. अन्यथा सर्व सत्य समोर आले असते. हल्याची महत्वाची दृश्ये समोर आणली नाही. एक हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केला. तर दुसरा अभिनव भारतने केला हे पुरावे समोर आले होते. पाकिस्तानच्या हस्तकांनी २८४ कॉलपैकी बोलतांना ताज,नरिमन, येथील हल्याबाबत चर्चा केली होती. कामा हॉस्पीटलवर हल्ला झाला त्यावेळी हल्लेखोर मराठीत बोलत होते. तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. एका दैनिकात अशी बातमीसुध्दा आली होती. आरोग्य खात्याचे अधिकारी भूषण गगराणी यांनी त्या रुग्णालयात जाऊन कर्मचाऱ्यांची विचारपुस केली  त्यावेळी कर्मचाऱ्यांनी गगराणी यांना अशी माहिती दिली. मात्र त्याचीही चौकशी झाली नाही. हल्लेखोर ज्यावेळी पकडले जातील त्यावेळी त्यांनी सर्व सामान सोडतांना  दोन मोबाईल फोन सोडून दिले होते. त्या मोबाईलवरुन अशी माहिती समोर आली होती की, ते साताऱ्यातील एका पक्षाच्या बड्या नेत्याशी संपर्कात होते. सर्व प्रकरणी १७ ऑगस्ट २०१० रोजी न्यायालयाने शासनाला नोटीस दिली होती. परंतु तो तपास अपूर्णच आहे. करकरेला कुणी मारले याचा तपास गुलदस्त्यातच आहे.  प्रत्येक पॉइंटला उत्तर द्या. परंतु आता पर्यंत उत्तर देण्यात आले नाही. फेरतपासाचा आदेश देण्यात आला नाही. करकरेला कुणी व का मारले? माजी आय.पी.एस अधिकारी एस.एम.मुश्रीफ यांनी यांच्या पुस्तकातून मांडलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments