Friday, April 19, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकर्नाटकातील ‘शोले’!

कर्नाटकातील ‘शोले’!

र्नाटकात भाजपा प्रचारासाठी संपूर्ण गब्बर गँगसह सांबालाही घेऊन आलेत. रेड्डी गँग निवडणुकीच्या कामाला जुंपली. तरी सुध्दा तुम्ही भ्रष्टाचारा बाबत बोलत आहात. असा टोला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला लगावला. कारण पंतप्रनान नरेंद्र मोदी हे कर्नाटकात भ्रष्टाचार झाला असे वेगवेगळे आरोप करत आहेत. परंतु भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार येदीयुरप्पा हे भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेत. तसेच रेड्डी बंधू हेही तुरुंगात जाऊन आले त्यांच्या कुटुंबियातही भाजपाने सात तिकिट दिली.  राहुल गांधी यांनी भाजपाला टोला लगावला की, गब्बर गँगसह सांबालाही घेऊन आलात. अमित शाह पासून, येदीयुरप्पा, रेड्डी बंधू ही सर्व भ्रष्ट मंडळी असल्यामुळे त्यांना गब्बर गँग म्हणून राहुल गांधी यांनी तसा नामोल्लेख केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांचा मुलगा जय शाहच्या कंपनीवर १५.७८ कर्ज असतांना २०१५-१६मध्ये उलाढाल १६ हजार पटीने वाढली असल्याचे दाखवण्यात आले. नीरव मोदी, ललीत मोदी, मेहूल चौक्शी, विजय माल्या यांच्या घोटाळ्या संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात ब्र सुध्दा काढत नाहीत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील भ्रष्ट नेत्यांना उमेदवारी दिली जाते जी मंडळी तुरुंगात जाऊन आली. त्यांच्या प्रचारात उल्लेख होत नाही त्यांना पाठिशी घालण्यात येते. असा आरोप राहुल गांधी करत आहेत आणि त्यामध्ये सत्यताही आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांबद्दल आणि त्यांच्या जवळच्या मंडळीबद्दल जाणून बुजून बोलण्याचे टाळतात. खरतर पंतप्रधानांकडून देशवासियांना खूप अपेक्षा होत्या. परंतु ते संसदेतही बोलत नाही आणि निवडणूकीच्या प्रचार संभांमध्येही बोलत नाही. याचाच अर्थ मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचा समर्थन करत असल्यामुळे देश भ्रष्टाचार मुक्त कसा होईल हाच खरा प्रश्न आहे. काँग्रेसने भाजपावर आणि भाजपाने काँग्रेसवर आरोप करुन देशातील भ्रष्टाचार कमी होणार नाही. कर्नाटक राज्याच्या विचार केल्यास भाजपाला भ्रष्टाचाराच्या आरोपावर बोलण्याचा नैतीक अधिकार नाही. जे माजी मुख्यमंत्री व सध्या पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहेत ते येदियुरप्पा भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाऊन आले. तसेच त्यांनी यापूर्वी भाजपातून बाहेर पडून दुसऱ्या पक्षाची स्थापना केली होती. पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करुन ते जर मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार असतील तर मोदी, शाह हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारा बाबत बोलतात. या जोडींना एक शब्दही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शाह, मोदी जोडी हे बोलण्यात पटाईत आहेत परंतु त्यांचा भ्रष्ट चेहरा हा जनतेला समजणे गरजेचे आहे. हे भ्रष्टाचार सर्वत्र बोकळला आहे. प्रचाराची पातळी एवढी घटली की, विकासाच्या मुद्यावर निवडणूका न होता जात, धर्म, पंथावर होत आहेत. कर्नाटकात भाजपाला जरी वरुन वरु ओके ओके वाटू लागले तरी सुध्दा अर्धेअधिक नेते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत. शोलेचा शो कुणाला लागू होतो ते बघणे गरजेचे आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments