होम संपादकीय विशेष लेख बलात्काऱ्यांविरोधात महिंद्रा खवळले!

बलात्काऱ्यांविरोधात महिंद्रा खवळले!

31
0

ठुआ’ सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. हे प्रकरण ताजं असतानाच सुरतमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. तीचाही आठ दिवस शारीरिक छळ करण्यात आला. या दोन्ही घटनांनंतर देशभरातून संताप व्यक्त होताना महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर आपल संताप व्यक्त केला. मी जल्लादाचं कामचही विनासंकोच करेन असा महिंद्रा यांनी ठणकावले. ‘आतापर्यंत जल्लादाच्या कामाला प्रतिष्ठा नव्हती. पण छोट्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्यायची असेल तर मी जल्लादाचं कामही विनासंकोच करेन. माझ्या देशात अशाप्रकारचं हिन कृत्य होताना पाहून माझं रक्त खवळतं. अशावेळी स्वत:ला शांत ठेवणं खूपच कठीण जातं.’ असं ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी आपला राग व्यक्त केला. बलात्कार प्रकरणी देशभरात तीव्र पडसाद उमटत असून राग व्यक्त करण्यासाठी व न्यायाच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. कठुआ प्रकरणात सर्वत्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसह अनेकजण रस्त्यारवर उतरले होते. कठुआ प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली. या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी मांडली आहे. सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आला आहे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत, गल्ली पासून विदेशापर्यंत बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. पोलिस आणि सरकार बलात्काराच्या गंभीर घटनेत आरोपींना पाठिशी घालत आहेत. त्यावेळी सर्वसामान्यांच्या मनात संताप येणारच. आरोपींनी क्रुर हत्या केली.अत्याचार केला. यामुळे सोशल मीडियावर या घटनेचा गंभीरपणे निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी कँडलमार्च काढून बलात्काराऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जोरदारपणे सुरु झाली आहे. काही मुजोर राजकीय पक्षाचे जातीयवादी नेते कार्यकर्ते बलात्काराच्या गंभीर घटनेवरुन राजकारण करण्याचे काम करत आहेत. या लोकांच्या संवेदना इतक्या बोधट झाल्यात का? त्यांना त्या निष्पाप चिमुरडीचा आणि उणाव मधील अत्याचार पिडितेचे काहीच देणे घेणे नाही का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. कठुआ येथील प्रकरणी पिडितीच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मात्र त्या वकिल महिलेने कशाचीही तमा न बाळगता खटला लडण्यासाठी पुढाकार घेतला. जर आरोपींच्या बचावासाठी पीडितेच्या वकिलांना धमकवलं जात असेल तर लोकशाही नसुन झुंडशाही आहे. झुंडशाही सत्तेच्या जोरावर धमकावण्याचे काम करत आहेत. झुंडशाही विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

वैदेही तामण
मुख्य संपादक