राष्ट्रवादीला दगाबाजी महागात पडली!

- Advertisement -

राज्यसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार अहेमद पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी मतदान केले नव्हते. काँग्रेसला दगाफटका देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवण्यासाठी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणूकीत दोन हात लांब ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबियांबद्दल गुणगाण गात आहेत. गुजरातमध्ये काँग्रेस सोबत जाऊ असे नुकतेच पवार यांनी विधान केले होते. राज्यसभा निवडणूकीत अहेमद पटेल यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपाची साथ दिली होती. भाजपाला साथ देण्याचे मुख्यकारण होते प्रफुल्ल पटेल! कारण पटेल हे हवाई वाहतूक मंत्री होते त्यावेळी मोठा घोटाळा झाला होता. त्या प्रकरणाची चौकशी होऊ नये यासाठी पटेल यांनी काही दिवसांपासून भाजपाशी जवळीक वाढवली होती. पटेल यांनी त्या प्रकरणाची चौकशी होऊ नये म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलवण्यावरुन प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे दोन मत अहेमद पटेल यांना मिळू दिली नाही,तरी सुध्दा अहेमद पटेल हे निवडूण आले होते. गुजरातची धुरा सध्या त्यांच्याकडे आहे तर राष्ट्रवादीची धुरा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्यात आलेली आहे. अहेमद पटेल यांच्या सोबत राष्ट्रवादीने दगाफटका केला होता त्यामुळे त्यांना विधानसभा निवडणूकीत सोबत घेऊ नये असाही एक सूर गुजरात काँग्रेसमधून निघाला असेल. त्यामुळे काँग्रेसने पहिली यादी जाहीर करतांना राष्ट्रवादीला विचारात घेतले नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रफुल्ल पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसही गुजरातमध्ये पूर्ण जागांवर उमेदवार देतील असे जाहीर केले. खरतर गुजरातमध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही. काँग्रेसने अजून राष्ट्रवादी काँग्रेसला गुजरातमध्ये सोबत घ्यायचे की नाही या बाबत आपले पत्ते उघडे केले नाही. राष्ट्रवादीला आता पर्यंत काँग्रेसतर्फे विचारपुस करण्यात आली नसल्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या राष्ट्रवादीलाही तिकिट हवे आहेत. परंतु काँग्रेसने काहीही भाव न दिल्यामुळे अखेर प्रफुल्ल पटेलने राष्ट्रवादी सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेसची मंडळी किती भाव देता आणि काय करता यावर बरच काही अवलंबून आहे. सध्या काँग्रेसकडून विचारणा होत नाही याचाच अर्थ राज्यसभा निवडणूकीत दिलेला दगाफटका आहे. मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकतं.

- Advertisement -