Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखविरोधकांची डिनर डिप्लोमसी!

विरोधकांची डिनर डिप्लोमसी!

यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २०१९ ची लोकसभेची लढाई जिंकण्यासाठी विरोधकांची मोट बांधून एनडीएला आव्हान देण्यासाठी १९ विरोधी पक्षांना डिनरसाठी निमंत्रण देऊन जी पाऊले उचलली ती चांगली सुरुवात आहे. भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधक जो पर्यंत एकत्र येत नाही तो पर्यंत राज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसचे नुकसान होत आहे. त्याचा फायदा भाजपा उचलत असल्याने देशाची वाईट परिस्थिती झाली आहे. देशाला एकसंघ ठेवण्यासाठी सोनिया गांधी यांनी विरोधकांना एकत्र करण्यासाठी जो पुढाकार घेतला तो स्वागतहार्य आहे. सोनिया गांधीच्या एकत्र येण्याच्या हाकेला यश मिळाले तर २०१९ ला देशातील चित्र वेगळे दिसू शकते. कारण भाजपा प्रणित एनडीएला २०१९ पूर्वी मोठा भगदाड पडणार आहे. याचाच फायदा यूपीएला होईल. कारण मोदींचा हेकेखोरपणा आणि भाजपाचे इतर मित्र पक्षांवर दबावाचे राजकारण हे काँग्रेससाठी नवसंजीवनी देणार ठरेल. याचाच फायदा इतर मित्रपक्षांनाही होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सीताराम येचुरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन, समाजवादी पक्षाकडून रामगोपाल यादव, एआययूडीएफचे बदरुद्दीन अजमल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, आरजेडीमधून मीसा भारती आणि जय प्रकाश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, झारखंड विकास मोर्चाचे बाबू लाल मरांडी, राष्ट्रीय लोकदलचे अजित सिंह आणि जयंत सिंह, सीपीआयचे डी राजा, सीपीएमचे सीताराम येचुरी आणि मोहम्मद सलीम, तामिळनाडूतील पक्ष डीएमकेचे कनिमोझी, बसपाचे सतीश चंद्रा, भारतीय ट्रायबल पक्षाचे शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि सुदीप बंदोपाध्याय, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी या नेत्यांची सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या डिनरसाठी निमंत्रण दिल. तसेच आययूएमएल, आरएसपी, केरळ काँग्रेस, जनता दल सेक्युलरचा समावेश आहे. एकूण २० पक्षांची मोट बांधण्यात येत आहेत.  २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांना मजबूतपणे उभं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. विरोधकांनी एकत्र येत लढल्यास मोदी लाट रोखता येईल, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. १६, १७ आणि १८ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. याला सर्वच विरोध होकार देतील. कारण विरोधक जो पर्यंत एकत्र होणार नाही तो पर्यंत भाजपा सत्तेच्या बळावर साम,दाम,दंडाचा वापर करुन निवडणूका जिंकत राहतील. यामुळे देशातील सर्व विरोधक काँग्रेसच्या युपीए प्रणित आघाडी सोबत एकत्र आल्यास २०१९ च्या निवडणूकांचा निकाल वेगळाच येईल. हे ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही. शेवटी राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कारण राजकारणात कुणीही कायमच शत्रु नसतो यामुळे आज जे मोदी सोबत आहेत ते उद्या काँग्रेस सोबत दिसतील. यामुळे विरोधकांना अच्छे दिन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments