Wednesday, April 24, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख‘संधीसाधू’ पवार!

‘संधीसाधू’ पवार!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे महाराष्ट्रातील मोठे नेते असले तरी संधीसाधू राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. बिनभरवश्याचे ते नेते आहेत. ‘सरड्या सारखा रंग’ बदलण्याचे काम आता पर्यंत पवार करत राहिले. पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करणारे नेते दिसतात तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हेही चांगले नेते दिसतात. यामध्येच पवारांचे राजकारण कसे संधीसाधू आहेत. हे स्पष्ट होते. याच शरद पवारांनी सोनिया गांधीचा विदेशीचा मुद्दा उकरुन वाद निर्माण केला होता. त्यावेळी काँग्रेसमधून पवारांना निलंबित करण्यात आले होते. राष्ट्रवादी पक्षाची स्थापणा केल्यानंतर पवारांनी पुन्हा काँग्रेस सोबत घरोबा केला होता. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यामुळे मोदींचे गुणगाण गाणारे शरद पवार हे एकमेव नेते आहेत. राज्यात भाजपाला विनविरोध पाठिंबा देणारे शरद पवार पुन्हा ‘डबल ढोलकी’ वाजणारे नेते असल्याचे सिध्द झाले आहेत. भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नाही. शिवसेनाच सत्तेत सहभागी झाल्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीला बाजूला फेकले. पंतप्रधान मोदी आणि पवार यांच्या इशारे सुरु असतात. बारामतीत एका कार्यक्रमाला मोदींना निमंत्रण दिले होते. यावरुन पवार यांचे मोदी प्रेम स्पष्ट होते. मोदी हे पवारांना ‘राजकीय गुरु’ मानतात. काल पुण्यात पवार मुलाखतीत म्हणाले मोदी खूप काम करतात. परंतु काय काम करतात हे ते बोलले नाही. बहुतेक मोदींच्या विरोधातही बोलले असते तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या विरोधातील प्रकरणाच्या फाईली उघडल्या असत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे गुणगान करणाऱ्या शरद पवारांना गुजरात निवडणूकीच्या निकालानंतर साक्षात्कार झाला आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळायला सुरुवात केली. काल पुण्यात एका मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधी बद्दल विचारल्यानंतर पवार म्हणाले राहुल गांधी मध्ये चांगला बदल दिसतोय, मी त्यांना १० वर्षपासून बघतोय. देशभर फिरुन, विषय लोक, मुद्दे जाणून घेण्याची त्यांची तयारी आता दिसतेय. ज्यामधलं आपल्याला समजत नाही ते समजून घेण्याचा राहुल गांधींचा सध्या प्रयत्न सुरु आहे, ही चांगली गोष्ट आहे हा बदल सकारात्मक आहे.  देशाच्या दृष्टीने एक मजबूत पक्ष असण्याची गरज आहे. भाजपला पर्याय काँग्रेस देऊ शकते. असं त्यांनी उत्तर दिल. गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपाला घाम सोडून लावणारे युवा नेते २०१९ साली राहुल गांधी हे एक आव्हान आहे हे स्पष्ट झाले. ‘‘मी पंतप्रधानपदाचा आदर करतो, पण माझे भांडण अहंकारी मोदींशी आहे व ही लढाई मी सभ्यता व संयम न सोडता लढेन,’’ असे राहुल गांधी सांगत होते. विकास व भ्रष्टाचार याबाबत राहुल गांधी यांनी काही मूलभूत प्रश्न गुजरात प्रचारात उभे केले. त्यांची उत्तरे शेवटपर्यंत मिळाली नाहीत. १४ राज्यांचे मुख्यमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, प्रचंड साधनसंपत्तीचा वापर व अमर्याद सत्ता गुजरात जिंकण्यासाठी वापरली गेली. त्यांच्यासमोर राहुल गांधी म्हणजे मातीचे गळके भांडे होते. तरीही राहुल गांधींनी त्यांचा घोडा रणाच्या मध्यभागी नेला व ते लढले. लोक लढणाऱ्याच्या मागे उभे राहतात. हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पवार आज स्तुतीसुमने उधळत आहेत. मोदींचेही गुणगाण गात आहेत. यातच त्यांचा संधीसाधूपणा स्पष्ट होतोय.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments