Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखराजदीप विरोधात गुंडशाही!

राजदीप विरोधात गुंडशाही!

र्नाटकात भाजपाच्या गुंडांनी मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा व भाजपाच्या जातीयवादी राजकारणाचा बुरखा फाडणाऱ्या पत्रकारांना लक्ष केले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या कर्नाटक विधानसभेच्या वार्तांकनादरम्यान भाजपच्या गुंडांनी गोंधळ घालून कामात अडथळा निर्माण केला. रविवारी नेहरू मैदानावरील भाजपच्या सभेत पंतप्रधान मोदींची सभा होती. सभेचे वार्तांकन राजदीप सरदेसाई करत होते. याआधी देखील वेगवेगळ्या ठिकाणी भाजप समर्थक गुंडाकडून सरदेसाई यांना अशाच पद्धतीने लक्ष्य करण्यात आले. पत्रकार राजदीप सरदेसाई देखील उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. काही भाजपाच्या गुंडांनी आक्रमक होत राजदीप यांच्या कामात व्यत्यय आणला. हा सत्तेचा माज असून मोदींचे गुंड सत्यवार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना धमकवण्याचा व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रकार करत आहेत. भाजपाच्या गुंडांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या. राजदीप सरदेसाई यांनी मात्र आपले वार्तांकनाचे काम सुरुच ठेवले. अशा विरोधाच्या परिस्थितीत देखील सरदेसाई यांनी जवळजवळ १ तास काम केले. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मोदी सरकारला अनेक अडचणीचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे भाजपाच्या गुंडाकडून हेतू पुरस्कर मोदीच्या चुकीच्या कामाचे जे माध्यम पत्रकार उघडपणे भूमिका मांडतात त्यांना धमकवण्याचे, नोकरीवरुन हटविण्यासाठी दबाव टाकण्यात आले. सत्य वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना नोकऱ्यांवरुन काढण्यासाठी मोदी सरकारने माध्यमसमूहांवर दबाव टाकले हे जगजाहीर आहे. राजकीय सभांच्या कार्यक्रमांमध्ये सरकारच्या कामकाजाचा बुरखा फाडणाऱ्या सच्च्या पत्रकारांना धमकवण्याचा व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे. पत्रकारांच्या कामात अडथळा आणणाऱ्या गुंड कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांची फूस असून त्यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे पत्रकारांना काम करता येऊ नये यासाठी गुंडगर्दी करुन दबाव आणण्याचा खेळ चालला आहे. सत्ताधारी भाजपाने सोयीच्या काही दलाल माध्यमसमूहांना खिशात घातले. काही माध्यमांमध्ये दलाल पत्रकार हे खोट्या कामांचा तसचे समाजात तेढ निर्माण होईल असे विषय घेऊन सरकारची उदो…उदो करत बसतात. जे सत्य मांडून नाकर्त्या सरकारची पोलखोल करतात त्या पत्रकांराना टार्गेट करण्याचे काम जोरात चालले आहे. आमच्या नाकर्तेपणा समाजासमोर मांडू नका नाही तर आम्ही तुम्हाला संपवू अशाच प्रकारे सरकारचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एनडी टिव्ही चे प्रक्षेपण थांबवण्याचा फतवा सरकारने काढला होता. परंतु वाढत्या विरोधानंतर तो फतवाही मागे घेण्यास त्यांना भाग पाडले होते. सरकारकडून वारंवर सत्य मांडणाऱ्यां,लिहीणाऱ्या माध्यमांची गळचेपी होत आहेत. कधी जाहीराती बंद करण्याची धमकी तर कधी माध्यमांतील चांगल्या पत्रकारांच्या नोकऱ्या घालवण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला. बरेच पत्रकार आज नोकऱ्यांपासून वंचित झालेत. काहींना माध्यम समूह बदलण्यासाठी भाग पाडले. सरकारची गुंडशाही असून माध्यमांमध्येही लोकशाही उरली नाही. सरकार च्या ‘आड’ जे येतील त्यांचा काटा काढण्यात हे सरकार माहिर आहे. न्यायदानात हस्तक्षेप तर मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे दस्तरखुद्द चार वरिष्ठ न्यायधिशांना पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे लागले होते. हे सरकारची गुंडशाही असून लोकशाही संपवण्याचा त्यांचा मनसुबा वेळीच हाणून पाडण्याची गरज आहे. अन्यथा हा सरकारचा अतिरेकीपणा देशाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही.

वैदेही तामण
मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments