Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखलचके तोडणारे सैतान!

लचके तोडणारे सैतान!

‘बेटी बचाव बेटी पढावचा नारा, देणारे भाजपचेच सैतान महिलांच्या अब्रूशी खेळत आहेत. उत्तरप्रदेशमधील उन्नावचा भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर आणि त्याच्या भावाने तरुणीचे लचके तोडले. पीडित तरुणीने न्याय मागितला, न्याय तर मिळाला नाही उलट तिच्याच पित्याची क्रुरपणे हत्या करण्यात आली. बलात्कार प्रकरणी न्याय मिळावा म्हणून पीडितीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे उंबरठे झिजवले परंतु तीची तक्रार तर कुणी घेतली नाही उलट तिच्या पित्याचा जीव घेतला. पोलिसांनी आमदार आणि इतरांविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवून घेतली नाही. मुख्यमंत्रीकडे पीडितेने दया मागितली होती. महिलांवर अत्याचार करणारे सत्ताधारी भाजपाचेच सैतानांचे खरे चेहरे विविध घटनांमधून समोर येत आहे. चंदीगडमध्ये भाजपा आमदाराच्या मुलाने तरुणीची छेड काढली होती. या सर्व घटनांवरुन भाजपाच्या नेत्यांना व त्यांच्या मुलांना सत्तेचा किती माज आलाय या घटनांमधून दिसून येतो. योगी आदित्यनाथ यांनी त्या पीडितेच्या गुन्हेगारांना ताबडतोब अटक केली असती तर तर आज पीडितेच्या पित्याचा जीव गेला नसता. पीडितेला न्याय देण्याऐवजी तिच्या पित्याला तरुंगात डांबून त्यांची हत्या करण्यात आली. आता मुख्यमंत्री आदीत्यानाथ कुणाला सोडल जाणार नाही असं बोलत आहे. परंतु ज्या आमदारावर तरुणीने बलात्काराचा आरोप केला त्या आमदाराला आदित्यनाथ पाठिशी घालत आहे. पीडिता या चार बहिणी,एक भाऊ आणि आईचे छत्र हरवले. त्यांना न्याय कसा मिळणार? एक तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणावर अत्याचार करुन उजळ माथ्याने भाजपाचा आमदार फिरत आहेत. मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई का नाही. पोलिसांनी आणि सत्तेच्या सैतानांनी न्याय दिला नाही म्हणून पीडितेला सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. या प्रकरणाची सीबीआयकडून सखोल चौकशी केली जावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. पीडितेला भरपाई दिली जावी तसंच तिला आणि तिच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवली जावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली. या प्रकरणात पीडितेच्या वडिलांचा तुरुंगात मृत्यू झाला होता. त्यानंतर आजच उत्तर प्रदेश पोलिसांनी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या भावाला अटक केली. लखनऊ क्राइम ब्रांचने कुलदीप सिंह सेंगरचा भाऊ अतुल सिंह याच्यासह चार आरोपींना अटक केली. विरोधकांकडून खरपूस टीका झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस हवालदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. आमदार कुलदीप सिंह सेंगर यांनीच पीडितेच्या वडिलांची हत्या घडवून आणली असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करुन सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर या महिलेच्या पित्याला पोलिसांनी खोट्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. कोठडीत पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ज्या आमदारावर बलात्काराचा आरोप आहे, त्याच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी वडिलांना मारहाण केली, असा नातेवाइकांचा आरोप आहे. यापूर्वी आमदारांविरोधात केलेली तक्रार मागे घेतली नाही म्हणून तीन एप्रिल रोजीही आमदाराच्या भावाने पीडितेच्या वडिलांना मारहाण केली होती. आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला तेव्हाही मला धमकावण्यात आलं होतं. असा आरोप पीडितेने केला. एका वर्षापासून न्यायासाठी पायपीट करत आहे, पण कोणीच दखल घेत नाही. अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर मी स्वतःचं आयुष्य संपवेल अशी धमकी पीडितेने दिलेली आहे. सत्ताधारी भाजपाच्या मंडळीला महिलांचा थोडा जरी सन्मान असेल तरी त्यांनी अत्याचार करणाऱ्या आमदारावर कारवाई करायला हवी. अन्यथा जनता माफ करणार नाही.

वैदेही तामण
मुख्य संपादक

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments