Tuesday, April 23, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखतेलुगू देसमचा ‘तलाक’?

तेलुगू देसमचा ‘तलाक’?

तेलुगू देसम एनडीएतून फारकत घेणार अशी जोरदार चर्चा सुरु होती. परंतु केंद्रातील भाजपाच्या एनडीएतून आमच्या समस्यांना न्याय मिळाला नाही तर पक्षाचे अध्यक्ष योग्यवेळी वेगळे होण्याचा निर्णय घेतील पण तोवर मात्र आम्ही एनडीए’मधून बाहेर पडणार अस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले. सत्तेतील पक्षाला ही भूमिका घ्यावी लागली याचेही बरेच कांगोरे आहेत. तेलुगू देसम पक्ष “एनडीए’मधून बाहेर पडणार ही अफवा होती असं माध्यमांनीच पसरविल्याचे केंद्रीय मंत्री वाय.एस.चौधरी बोलून मोकळे झाले. एकीकडे अफवा म्हणायचे आणि दुसरीकडे आमच्या समस्यांना न्याय नाही मिळाला तर पक्षाचे अध्यक्ष योग्यवेळी ठरवतील अशी धमकी द्याची. खरतर राजकारणात ही फॅशन झाली आहे. ज्यावेळी हित पूर्ण होत नाही तो पर्यंत दबाव तंत्राचे आणि धमक्याचे राजकारण करायचे. ज्यावेळी मागण्या पूर्ण झाल्या. व मनाप्रमाणे काम झाले त्यावेळी ऑल ईज वेल आहे बोलून मांड्याला मांड्या लावून बसायच. हे राजकारणात सर्रास सुरु आहे. असाच तेलुगू देसमाचा प्रकार होईल. ताज्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्रप्रदेशसाठी कोणतीही भरीव तरतूद नसल्याने (एनडीए)तून बाहेर पडण्याचा इशारा आहे. “टीडीपी’च्या या निर्वाणीच्या इशाऱ्याचे पडसाद दिल्लीमध्येही उमटले होते. आता पक्षांतर्गत राजकीय विचारमंथनानंतर चंद्राबाबूंनी माघार घेत भाजपशी असणारे मैत्रीसंबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमचा पक्ष भाजपप्रणीत “एनडीए’मधून बाहेर पडणार नाही. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली अमरावतीमधील त्यांच्या निवासस्थानी आज झालेल्या पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार उपस्थित होते. राज्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न आम्ही सर्वप्रथम केंद्राच्या कानी घालून ते सोडविण्याचा प्रयत्न करू. सरकारने याची दखल घेतली नाही तर आम्ही संसद आणि सभागृहाच्याबाहेर आंदोलन करू. खरतर हे दबाव तंत्राचे राजकारण लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. एनडीएमध्ये राहून शिवसेना नाराज आहे. राजु शेट्टी यांची स्वाभीमानी शेतकरी संघटना एनडीतून बाहेर पडली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकी पर्यंत एनडीएतून बरेच पक्ष बाहेर पडतील. सत्तेत जो पक्ष असतो त्याच्या सोबत घरोबा करुन सत्तेची फळ चाखायची आणि वारे उलट्या दिशेने वाहू लागले असं ज्यावेळी कळायलं लागत त्यावेळी फारकत घ्यायची. हा काही नवीन प्रकार नाही. काँग्रेस प्रणीत युपीएच्या सत्ताकाळात असाच प्रकार झाला होता.  आता त्याचीच पुनरावृत्ती एनडीएमध्ये होत आहे. मात्र स्वार्थासाठी राजकीय पक्ष कोणत्या पध्दतीने राजकारण करतात हे येथे स्पष्ट होते. मात्र तेलुगू देसमला आश्वासनांचे गाजर मिळाल्यानंतर तेही सर्व काही ठिक आहे म्हणत नाराजी दूर झाली असं म्हणतील. मात्र तो पर्यंत तलाक लांबणीवर जाईल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments