Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयविशेष लेख'न संपणारी कथा...' - जान्हवी गुर्जर

‘न संपणारी कथा…’ – जान्हवी गुर्जर

एकदा एका गावात बाळू नामक व्यक्ती सारखा कोणाला तरी पकडून गोष्टी सांगत असे, त्या मोठ्या न संपणाऱ्या गोष्टींच्या भीतीने लोक बाळूला बघून पळ काढत असे तरीही बाळू दिसेल त्याला पकडून गोष्ट सांगत बसायचा. सगळ्या गावातील लोक त्रस्त झाले आणि राजाकडे बाळूची तक्रार केली. राज्याचे सैनिकांनी बाळूला पकडून कैद केले आणि दुसऱ्या दिवशी राजासमोर त्याला उभे केले. बाळूला का पकडून आणले हे सांगितले व त्याच्या बद्दल त्याचे म्हणणं काय आहे असे विचारले बाळू परत कथा सांगायला लागला. राजाही कंटाळला पण राजाला एक युक्ती सुचली आणि राज्यात जो कोणी अक्षम्य गुन्हा करेल त्याला बाळूच्या स्वाधीन करायला सांगितले त्यामुळे बाळूची कथा सांगायची हौस पूर्ण होईल आणि गन्हेगाराला पण शिक्षा मिळेल.

काहीं दिवसांनी गावातील गुन्हे पण कमी झाले आता बाळूच काय करावे नाहीतर तो परत आपल्याला कथा ऐकवत बसेल म्हणून राजाने त्याच्या साठी एक भव्य दालनात अनेक मुर्त्या ठेवायला सांगितल्या आणि बाळूला त्या मूर्त्यांना कथा सांगायला सांगितल्या. बाळू दिवस रात्र त्या मूर्त्यांना कथा सांगत बसला शेवटी त्या मूर्त्याही भंग पवायला लागल्या. आता बाळू देवाचा धावा करू लागला देव पण घाबरून गेले आणि यामराजला शरण गेले. यामराजाने बाळूला धर्ती वरून उचलून वर आणले पण बाळू येथेही थांबेना मग कंटाळून यामराजने त्याला परत भुलोकात पाठवायचे ठरविले पण कोणत्या स्वरूपात ह्याचा विचार केला तेव्हां त्यांनी बाळूला टीव्ही (tv) वर मालिका लिहावयास सांगितल्या आणि अश्या रीतीने आजही आपण न संपणाऱ्या मालिका बघतोय ये या बाळूच्या कृपेने.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments