दिल्लीचे दुश्मन!

- Advertisement -

High alert in Mumbai after of Delhi violence

देशाच्या राजधानीत प्रक्षोभक विधाने करुन दिल्लीत दंगल भडकली. दिल्लीत चार दिवस हिंसाचार सुरु होता. ४८ पेक्षाजास्त माणसं मारली, हत्या केली. अजून किती बळी जाणार अजून सांगता येत नाही. समाजकंटकांनी घरं, दुकानांची राख रांगोळी केली. दिल्लीत आजही नागरिकांच्या मनात भय कायम आहे. ज्या नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केली, दंगली भडकल्या ते नेते मोकाट आहेत. दंगली सुरु असताना दिल्ली पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली की त्यांना तशा सूचना होत्या हा खरा प्रश्न आहे. देशाची राजधानी जळत असताना गृहखातं कायं करतं होतं. अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा,परवेश वर्मा,संगीत सोम, गिरीराज सिंह यांच्यासारखे वाचळविर, चिथावणीखोरांवर गुन्हे दाखल होत नाही. त्यामुळे दिल्लीत हत्याकांड घडवण्यात आले.

दिल्लीच्या घटनेमुळे जगभरात नाचक्की झाली. दिल्लीतील हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे. जमावाच्या हिंसाचारात लक्ष्य झालेल्या मुस्लिम व इतर धर्मीयांच्या संरक्षणासाठी भारत सरकारने गंभीरपणे प्रयत्न करावेत, असे अमेरिकन सरकारच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरिस यांनी दिल्लीतील हिंसाचाराने मी दु: खी झालो आहे. अशी प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेससह विरोधकांनी गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गृहमंत्री अमित शाहांचा राजीनामा मागितला आहे. परंतु राजीनामा मागून किंवा देऊन ज्यांचा बळी गेला ते परत येणार नाही. ज्यांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला. माणसांमध्ये व्देष पसरवण्यात आलंय, ज्या भिंती उभारण्यात आल्या त्याचं काय?

- Advertisement -

दिल्लीतील दंगलीदरम्यान दाखवलेल्या निष्क्रियतेवरून दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारला फटकारणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांनी मंगळवारी रात्री १२: ३० वाजता दंगल आणि जखमी दंगलग्रस्तांच्या उपचारांवरून आपल्या निवासस्थानी सुनावणी केली होती. त्यांची बदली केली जाते. प्रक्षोभक भाषणे देणा-या भाजप नेत्यांना वाचवण्यासाठी न्या.मुरलीधर यांची बदली करण्यात आली. प्रामाणिक न्यायपालिकेचे तोंड बंद केल्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या विश्वासाला तडे गेले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली हत्याकांडवर चकार शब्द सुध्दा काढला नाही. अमित शाहांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदारांना ईव्हिएमचा बटन इतका जोरात दाबा की करंट शाहीनबागमध्ये लागला पाहिजे अशी विधाने केली होती. प्रचारादम्यान पायी यात्रा काढल्या,पत्रके वाटली. परंतु आज देशाची राजधानी जळत असताना गप्प का? हाच गंभीर प्रश्न आहे. त्यांच्या मुकसंमतीनेच हे तर घडवण्यात आलंय हेच स्पष्ट होतंय.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here