Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखआम्ही सामान्य लोकांचा आवाज आहोत

आम्ही सामान्य लोकांचा आवाज आहोत

Afternoon Voice, Mumbai Manoos, Vaidehi Taman, Vaidehi Sachin, Editorial, Marathi Edit, Sampadakiya

खाद्या प्रकाशन संस्थेवर मालकी हक्क मिळवून अगर एखादे वृत्तपत्र ताब्यात घेऊन त्याचा स्वार्थापोटी पुरेपुर वापर करून घेणे, ही एखाद्या व्यापारी सिंडीकेट अथवा कोण्या राजकारणी माफियासाठी काही नवी बाब राहिलेली नाही.

मात्र सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी वचनबद्ध असलेली ही माध्यमे सामन्यांच्या दाहक वंचनांना तोंड फोडतील तर शप्पथ! मग शोषित, पीडितांसाठी असलेले माध्यम जर शोषणकांचेच हत्यार होऊन बसतील तर तिथे आपण काय करणार? कुर्‍हाड़ीचा दांडा, गोत्यास काळ होण्यापेक्षा नकोच तो जॉब, आणि नको ती नोकरी.

आणि मग सोडून दिली ती नोकरी. आम्ही सगळे बंडखोर एकत्र आलो आणि सुरू करून टाकले हे वृत्तपत्र.

इथेही माफिया पिच्छा सोडायचे नाव घेत नव्हते. आमच्यावर आणखीन दबाव वाढत गेला.मात्र मीडिया हॉउसच्या इतर वेठबिगारांप्रमाणे आम्ही मात्र आमची बुद्धी गहाण ठेवली नाही.आमच्यासाठी भविष्यात संधीची द्वारे बंद करण्याच्या धमक्या येऊ लागल्या. मात्र आम्ही काही त्यांना भिक घातली नाही. आम्ही आमची स्वतःची प्रकाशन संस्था उघडण्याचे ठरविले. यासाठी आवश्यक असलेले भांडवल उभारण्यासाठी स्वतःचे घर गहाण ठेवले.

कुटुंबियांनी सुद्धा हातभार लावला, इतरही बरेच हात सरसावले आणि ‘आफ्टरनून व्हॉइस’ चा जन्म झाला.

पाहता पाहता एक तप उलटून गेले.

आज याचा बारावा वर्धापन सोहळा साजरा होत आहे.गेल्या 12 वर्षांत अनेक कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले.

आमच्यावर कोणत्याही तत्वज्ञानाचा पगडा नाही की कोणत्याही विचारसरणीला बांधिल नाही.कोणत्याही राजकीय वा इतर प्रकारच्या विचारांशी काहीही घेणे देणे नाही. ना कुणाचा द्वेष, ना कुणाशी आपुलकी.कुणाविषयी काही तक्रारही नाही. कोणत्याही राजकीय गट अगर पक्षाच्या गुलामीचे जोखड आमच्या गळ्यात नाही. ना कुणाचा हेवा ना कुणाशी मत्सर.आम्ही मात्र मुक्त, स्वतंत्र. पत्रकारिता हाच आमचा एकमेव एजेंडा.हे आम्ही स्वतः सांगत नाही.

वस्तुस्थिती स्वतःच बोलते.आम्ही सतत पाठपुरावा करतो प्रश्नांचा. शोधतच असतो काही ना काही.त्यांच्या उत्तरांचा मागोवा घेत असतो. त्यात आम्हाला यश सुद्धा मिळते.आम्हाला बोलायचे असते, निर्भीडपणे बोलणे चालूच ठेवायचे आहे.कारण आम्ही ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, ती सामान्य माणसे स्वतःसाठी नाही बोलू शकत स्वतःसाठी कधी.

त्यांच्या वंचना, त्यांचा आवाज प्रस्थापितांपर्यंत धडकविण्यासाठी, आपण बोललेच पाहिजे.या खडतर संघर्षात आपण कुणा एकाचे कधीच होऊ शकत नाही. ना कुणाशी आपुलकी ना कुणाचा द्वेष. नसता पत्रकारितेत न्याय शक्य नसतोच.कुणाचाच आवाज निर्भीडपणे मांडणे शक्य होत नाही.हरेक जणाचा दंभ कुरवाळणे शक्य नसते.

प्रत्येकाला खुश ठेवणे शक्य नसते.प्रत्येक जण आपल्याला आवडेलच, असेही नाही. कॉंग्रेसवर टीका केली तर भाजपा समर्थक म्हटले जातो.भाजपला प्रश्न विचारला तर भाजपविरोधी ठरतो.आम आदमी पक्षाला जाब विचारला तर राष्ट्रीय पक्षांचे प्यादे ठरतो.राज यांच्याबद्दल बोललो तर उद्धव विरोधी ठरतो, आणि उद्धवजी यांना प्रश्न विचारला तर पवारांच्या बाजूचे ठरतो.स्वार्थाच्या बाजारात माध्यमांची जाहीर बोली लागत असताना, जाहीर लिलाव होत असताना, पुरते वस्त्रहरण होत असताना आम्ही मात्र प्रवाहाच्या अगदी विपरित दिशेने पोहत आहोत.निष्पक्ष आणि सडेतोड व निर्भीडपणे पत्रकारिता करीत आहोत.एक छोटे से वृत्तपत्र, एक छोटीशी टीम, हजारो वाचक आणि बरेच दर्शक… दररोज शेकडो कॉल येतात, बरेच मिस्ड देखील होतात.बर्‍याच तक्रारी येतात, पैकी बर्‍याच तक्रारी सुटतात.

सर्वांची साद ऐकतो आम्ही.शक्य होईल तेवढी ऐकतो, सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.बरेच निर्णय घेतो.

कारण वर्तमानपत्र हे काळाच्या पावलांनी चालते.कधीकधी निर्णय चुकतात.आम्हीही चुकतो.मात्र अक्षम्य चुका घडू देत नाही.पत्रकारिता प्रामाणिकता आणि विश्वासार्हतेच्या कसोटीवर असावी असे प्रत्येकाला वाटते.

मात्र याची कहानी बदलत जाते.सत्य ऐकायचे आहे, सत्याचाच आवाज ऐकायचा, असे साहजिकच वाटते.

मात्र प्रश्न विचारला जातो तेव्हा विलक्षण दुसरेच काहीतरी समोर येते.सत्य असत्याची व्याख्याच बदलते. आपला स्वार्थ साधणारे ते सत्य आणि स्वार्थाविरोधी असेल ते असत्य, अशी व्याख्या करण्यात येते. या व्याख्येनुसार जर पत्रकारिता झाली तर ती शोषक वर्गाची बटकी ठरते. आजकाल प्रत्येकजण माध्यमांवर टीका करताना दिसत आहे.

मात्र सत्य पचनी पडणे अवघड असते.कारण त्यांच्या व्याख्येनुसार सत्य हे आमच्या वास्तविकतेच्या पूर्णपणे विरुद्ध आणि आपली वास्तविकता त्यांच्या सत्याच्या पुर्णपणे विरुद्ध असते.आपण प्रत्येकाचा आवाज होऊ शकत नाही.

पण सर्वसामान्यांचा आवाज मात्र होणे नक्कीच शक्य आहे.प्रत्येकाच्या विचारांच्या पावलांवर पावले ठेऊन चालणे शक्य नसते.यामुळे सत्याची पुरती फरफट होत असते.म्हणुनच कुण्या विशिष्ट विचारसरणीची वेसन आपल्या नाकी घालून घेणे निदान आम्हाला तरी शक्य नाही.मग आम्ही कोण? असा प्रश्न जर विचाराल, तर त्याचे उत्तर एकच… आम्ही केवळ पत्रकार..!आम्ही आजच्या या विशाल मीडिया जगताचा फक्त एक छोटासा भाग आहोत.

तुम्हाला तुमची आवड निवड जोपासण्याचा पूर्ण अधिकार, पूर्ण स्वातंत्र्य आहे.प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य होत नसले तरी शक्य होईल तिथपर्यंत पोचतो.मात्र जिथे जिथे पोचतो, तिथे तिथे निर्भीड पणे सडेतोड गर्जना करतो.

आमचे योगदान नव्या भारतासाठी आहे, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे.आम्हाला माहित आहे की आम्ही आमच्या पंतप्रधानांचे अनुसरण करतो, हा डिजिटल इंडिया आहे आणि हे बेटी बचाओ, बेटी पढाओ हे ध्येय आहे.

मात्र आम्ही त्याची पूर्ण चिकित्सा व पोस्टमार्टम करतो, अगदी कर्तव्य समजून.कोणत्याही ध्येय धोरणाचे खरे स्वरुप आणि खरा अजेंडा कसा असू शकतो याचे दर्पण आमच्याकडे असते आणि तो आरसा आम्ही निर्भीडपणे दाखवून देतो.एखादा राज्यकर्ता असो की राजकारणी.त्याची खोटी स्तुती करण्याची भाटगिरी मात्र आम्ही करू शकत नाही,करीतही नाही.कटू सत्याला खोट्या शब्दांची सोनेरी किनार लाऊन सादर करणे आम्हांस शक्य नाही.

सनसनाटी पसरवण्याच्या नादात घटनांचे कृत्रिम फटाके फोडून लोकांचे हकनाक हृदय हेलावणे आमच्या पत्रकारितेच्या व्याख्येत बसत नाही.नको आम्हाला तो टाळ्यांचा कडकडाट.नको ती पाठ थोपटी प्रतिष्ठा.

काय साध्य होणार यातून?आहे तशाच स्वरुपात, किंचितही कमी जास्त न करता जशास तश्या बातम्या वाचकांपुढे ठेवणे आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देणे, हा पत्रकारितेचा आत्मा जोपासायचा आहे आम्हाला. कदाचित आपल्याला प्रश्न पडला असेल की, कोणतेही राजकीय, आर्थिक पाठबळ नसताना ही प्रकाशन संस्था कशी चालत असावी?तर याचे उत्तरही अगदी स्पष्ट आहे.आमच्याकडे बरीच क्लासिफाइड्स आहेत. आम्ही उत्पादन मोहिमा चालवितो आणि विविध व्यवसाय गट आणि त्यांचे नव नवीन उपक्रम राबवितो.त्या जाहिरातींमधून काही उत्पन्न मिळते.शिवाय आमच्याकडे काही समांतर उपक्रम आहेत. जसे माझे स्वत:चे क्लिनिक आहे.मी एक सायबर सुरक्षा ऑडिटचे काम करते.आम्ही सर्वच आपापल्या क्षेत्रात काम करतात.त्याचबरोबर काही चांगले हात सरसावतात. ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स’ सारख्या वार्षिक पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन देखील केले जाते.याद्वारेही या छोट्या उद्योगाला थोडी ऊर्जा मिळते.आमच्या समूहात बरेच दिव्यांग बांधव आहेत.काही अ‍ॅसिडग्रस्त आहेत.

परिस्थितीला बळी पडून अर्धवटच शिक्षण सोडलेले काही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.

आम्ही सर्व जण गुण्यागोविंदाने एकत्रितपणे स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आणि त्यांचे जीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करतो.त्यांना मदत करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करतो. गेल्या 12 वर्षात अनेक चढ उतार पाहिले.

खूप संघर्ष केला.मला आठवते.मुंबईचे माजी पोलिस आयुक्त शिवानंद माझ्या वृत्तपत्राचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी विनोदाने म्हटले, “वैदेही, मी बाल कामगार कायद्यांतर्गत तुम्हाला आणि तुमच्या टीमला अटक करीन.”कारण आम्ही सर्व तरुण, अगदी लहान आणि प्रत्यक्षात समूहातील निम्मे सदस्य हे महाविद्यालयीन विद्यार्थी.

आम्ही डेस्कवर बसलेल्या ज्येष्ठांची परंपरा मोडीत काढली.मात्र त्यांचे आकलन, मुद्दे आणि पद्धती कशास तशी जोपासली.आजही, माझ्या डेस्कवरील उप-संपादक असलेली सर्वात वरिष्ठ व्यक्ती केवळ 23 वर्षांची आहे.

प्रशासन व्यवस्थापक देखील 27 वर्षांचा आहे.माझी टीम खूपच तरुण आणि खूपच लहान असली तरी दृष्टीने मात्र विशाल आहे.आणि म्हणूनच कदाचीत आम्ही इतरांपासून वेगळे आहोत. आमच्याकडे फार मोठा वाचक वर्ग नाही.

कारण आम्ही मोठ्या संख्येने वृत्तपत्रे छापु शकत नाही.मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी आमच्याकडे ऑनलाइन आवृत्ती आहे.माझी सर्वांना विनंती की, आपण आमची ऑनलाईन आवृत्ती नक्कीच पहा आणि आम्हाला प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याची संधी द्या.तुमच्या सूचना नेहमीच शिरसावंद्य!

ज्या अर्थी मी म्हटले, आम्ही सामान्य लोकांचा आवाज आहोत, तेव्हा आपण एकत्रितपणे माध्यमांचा दृष्टीकोन बदलू शकतो किंवा किमान एखादी व्यक्ती बदलू शकतो. बळीराम गायकवाड , कै. भय्यूजी महाराज, डॉ. विश्व नाईक, अ‍ॅडव्होकेट रोहिणी सालिआन, पद्मश्री शोमा घोष, पद्मश्री कानन, श्री अनिलकुमार, श्री. वैशाली आणि अशी बरीच लांबलक यादी आहे. तसेच सर्व संचालक मंडळी, कर्मचारी आणि सर्वात मुख्य म्हणजे माझे वाचक!

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments