…तर राणेंचा गेम होईल?

- Advertisement -

स्वाभीमानी पक्षाचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर ७ डिसेंबरला निवडणूक होणार आहे. राणे यांचा पक्ष एनडीएमध्ये सामिल झाला आहे. भाजपाच्या भरवश्यावर राणे आमदारकीचे स्वप्न बघत आहेत. परंतु निवडून येण्यासाठी त्यांना १४५ मतांची गरज असतांना भाजपाकडे १२२ आमदारांचाच आकडा आहे. राणे हे वादग्रस्त नेते असून त्यांचे शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीसोबत चांगले संबंध नसल्यामुळे त्यांचा गेम करण्याची तिन्ही पक्षांना चांगली संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे,संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्यांशी भेट घेतली होती. या भेटी दरम्यानही राणे विषयी गेमप्लॅन तयार करण्यात आला. काँग्रेसचे ४२,राष्ट्रवादीचे ४१ तर शिवेसेनेचे ६३ आमदार असा एकुण आकडा १४५ अशी संख्या होते. परंतु यातून राणे यांचे चिरंजीव काँग्रेस आमदार नितेश राणे जरी राणेच्या बाजूने गेले तरी काँग्रेसकडे १४४ हा आकडा राहतो. अपक्षही जर भाजपाच्या बरोबर गेले तरी सेना,काँग्रेस,राष्ट्रवादीचा संख्या जास्तच आहे.त्यामुळे राणेंचा विधानपरिषदेत निवडूण येऊन मंत्री बनण्याचा मनसुबा अपूर्ण राहू शकतो. काँग्रेस,राष्ट्रवादी या पक्षांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही.परंतु राणेंना सहज विधानपरिषदेत जाता येईल अशी भूमिका काँग्रेससह शिवसेना,राष्ट्रवादी घेणार नाही.राणेंना आपला पराभव आताच कळून चुकला आहे त्यामुळे ते विधानपरिषदेत जाण्यासाठी धोका पत्करत नाही हेही तितकेच सत्य आहे.राणे यांच्या पक्षाकडे एकही आमदार नाही.सहा अपक्ष आमदारांची जरी भाजपाला साथ मिळाली तरी सुध्दा राणे निवडूण येऊ शकत नाही. राणे हे बिकट परिस्थितीत अडकले आहेत. राणे यांना निवडणूक लढणार नाही हे जाहीर करावे लागेल. राणे यांनी भाजपावर विश्वास ठेवला आणि शिवसेनेची साथ मिळेल अशा अर्विवभावात ते राहिले तर त्यांचा निश्चित गेम होऊ शकतो. त्यामुळे राणे हे अनुभवी व मुरब्बी राजकारणी नेते असल्यामुळे ७ डिसेंबरची विधानपरिषदेची निवडणूक लढणार नाही. असेच वाटते.

- Advertisement -