Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeआरोग्यअॅक्युप्रेशरने वेदना दूर होतात!

अॅक्युप्रेशरने वेदना दूर होतात!

दररोजच्या जीवनशैलीमध्ये शरीरात लहानसहान वेदना होणं ही सामान्य बाब आहे. पण छोट्या-छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणं बरेच लोक टाळतात. तसच डॉक्टरांकडे जाणंही  परवडणारं नसतं. त्यावर एकच उपाय तो म्हणजे अॅक्युप्रेशर. अॅक्युप्रेशरने अशा लहानसहान वेदना काही मिनिटातच दूर होतात. पाहुयात अॅक्युप्रेशरचे काही खास फायदे.

१.बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला होणं ही खूप सामान्य बाब आहे, त्यासाठी जास्त पॉवर असलेली औषधं घेतल्याने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्याऐवजी दोन्ही पायांच्या अंगठ्यावरील भागावर प्रेशर दिल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

२.रोजच्या कामामुळे अनेक चिंता असतात, तणाव असतात, त्यासाठी पायांच्या बोटांवर प्रेशर द्या.याने शरीरातील तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते आणि काही क्षणातच विश्रांती मिळते.

३.रोजच्या या गर्दीच्या आयुष्यात डोकेदुखी होणे सामान्य बाब आहे पण त्यासाठी सारखं डॉक्टरांकडे जाणे किंवा औषधं खाण्यापेक्षा आपल्या हातांच्या बोटांवरील भागाने मसाज केल्याने डोकेदुखी क्षणात निघून जाते.

४.महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप त्रास होतो. महिलांना या काळात अॅक्युप्रेशरने फार आराम मिळतो, पायाच्या खालील बाजूस हलके प्रेशर द्या. असे सलग दहा मिनिटे केल्याने मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments