ऑनलाइन लिपस्टीक घेताना घ्या ही काळजी

- Advertisement -

Online Lipstickआजकाल ऑनलाईन खरेदीचा फॅड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धावपळीच्या या जगात वेळ वाचवण्यासाठी आता जास्तीत जास्त लोक ऑनलाइन शॉपिंग करतात. मात्र, स्त्रियांनी ऑनलाइन शॉपिंग करताना विशेष काळजी घेतलीच पाहिजे. महत्वाचं म्हणजे सौंदर्यप्रसाधने घेताना आपल्या चेहऱ्यावर कसलीही अॅलर्जी होऊ नये म्हणून खात्री करुनच खरेदी करावी.

ऑनलाइन लिपस्टिक घेताना दक्षता बाळगा. मेकअपचे प्रोडक्ट घेताना सूट मिळाली की लागलीच त्या आकर्षणाने स्त्रिया खरेदी करतात. पण लिपस्टिक घेताना ज्या नेहमी मेकअपचे प्रोडक्ट ऑनलाइन घेतात त्या महिलांकडून एकदा शहानिशा नक्की करुन घ्यावी.

ब्रँड आणि रंगानुसार प्रत्येक लिपस्टिकला वेगवेगळा कोड असतो. म्हणून आपल्याला आपल्या पसंतीची लिपस्टिक ऑर्डर करायची असेल तर त्याचा कोड लक्षात ठेवा, कारण ऑनलाइन लिपस्टिकचा रंग अचूक समजणे कठीण आहे.

- Advertisement -

लिपस्टिक निवडली की त्याचे दर आणि एक्स्पायरी डेट तपासल्यानंतर ग्राहकांच्या प्रतिक्रियादेखील वाचा. जेणेकरुन त्यांच्या अनुभवातून संपूर्ण माहिती मिळेल. यामुळे आपल्या हाती बनावट वस्तू लागणार नाही.

मूळ संकेतस्थळावरून लिपस्टिक विकत घेणे चांगले. कदाचित येथे सूट मिळण्याची शक्यता कमी आहे, परंतु किमान आपल्याला बनावट वस्तू मिळणार नाहीत.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here