Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeआरोग्यहे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर

हे, व्हिटॅमिन्स केस वाढण्यास फायदेशीर

सौंदर्य हे केसांमुळे असते असे म्हणतात. पण त्यासाठी हे केस तितके छान असणे आवश्यक आहे. केस हा प्रत्येक महिलांचा जिव्हाळ्याचा विषय. आपले केस लांब, मजबूत असावे, केसांचं गळणं कमी व्हावं म्हणून महिला विविध उपाय करत असतात. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे शाम्पू आणि कंडिशनर चांगला असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे आहारातूनही केसांना आवश्यक घटक शरीरात जाण्याची आवश्यकता असते. यामध्येही व्हिटॅमिन्स (जीवनसत्त्वांचा) सहभाग महत्त्वाचा असतो. पाहूयात केस वाढण्यासाठी कोणते व्हिटॅमिन्स महत्त्वाची भूमिका बजावतात.

व्हिटॅमिन ए  पेशींच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ए अतिशय उपयुक्त असते. केसातील सिबमचे उत्सर्जन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी व्हिटॅमिन ए उपयुक्त असते. केसांच्या मजबुतीसाठीही व्हिटॅमिन ए उपयुक्त असते. रताळे, गाजर, पालक या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए पुरेशा प्रमाणात असते.

व्हिटॅमिन बी  रक्ताच्या पेशींची निर्मिती करण्यासाठी व्हिटॅमिन बीची आवश्यकता असते. डोक्याच्या त्वचेचे चांगल्या पद्धतीने पोषण होण्यासाठी आणि ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी या व्हिटॅमिनचा उपयोग होतो. केस वाढण्यासाठीही हे व्हिटॅमिन उपयुक्त असते. सर्व धान्यांमध्ये, मांस, मासे आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण जास्त असते.

व्हिटॅमिन सी  शरीरात कोलेजनचे उत्पादन करण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त असते. केसांच्या वाढीसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. स्ट्रॉबेरी, काळी मिरी, पेरु आणि आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते.

व्हिटॅमिन डी  शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास केस गळण्यामध्ये वाढ होते. केस घनदाट होण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. सूर्यप्रकाश, कॉर्ड लिव्हर ऑईल, फॅटी फिश आणि मशरुम यामध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असते.

व्हिटॅमिन ई  केस वाढण्यासाठी या व्हिटॅमिनची शरीराला आवश्यकता असते. सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक यांमधून व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments