Friday, March 29, 2024
Homeट्रेंडिंगआता Google Maps सेवा मराठीत

आता Google Maps सेवा मराठीत

भारतात युजर्स गुगल मॅपचा Google Maps वापर करतात. पण ही सेवा इंग्रजीत असल्याने इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत होता. आता कंपनीने युजर्सच्या आवश्यकतेनुसार यामध्ये काही बदल करण्याची घोषणा केली आहे. यानुसार आता ही सेवा मराठी भाषेतही उपलब्ध होणार आहे.

जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, त्यामुळे भारतीय नेटकऱ्यांच्या गरजांकडेही विशेष लक्ष दिलं जातं. त्यामुळे गुगलनेही भारतीय युजर्सच्या गरजा आणि त्यांच्या समस्या लक्षात घेऊन गुगल मॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

कंपनीने गुगल मॅप्समध्ये 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन Automatic Transliteration सिस्टिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. स्थानिक भाषेत गुगल मॅपची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना एखादा पत्ता वगैरे शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

एका ब्लॉग पोस्टद्वारे गुगलने 10 भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. गुगल मॅपची सेवा आता मराठीसोबतच हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही वापरता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments